How to make upvas sabudana-khichadi recipe (साबुदाणा खिचडी) in marathi

साबुदाणा खिचडी हा उपवासाचा सर्वांच्या परिचयाचा व आवडीचा पदार्थ असतो.  कित्येकदा हा पदार्थ ब्रेकफास्ट / स्नॅक म्हणून आवडीने खालला जातो. प्रत्येक मराठी घरात उपवास कोणताही असो उपवासाची साबुदाणा खिचडी ही असतेच. 



How to make upvas sabudana-khichadi recipe (साबुदाणा खिचडी) in marathi


                               साबुदाणा खिचडी 


खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :


  • १ वाटी साबुदाणा 
  • १/२ वाटी शेंगदाणा 
  • ३-४ हिरव्या मिरच्या 
  • १ बटाटा 
  • २ मोठे  चमचे साजूक तूप 
  • १/२ छोटे चमचे जिरे 
  • साखर चवी पुरती 
  • मीठ 
  • ओल खोबर,कोथींबीर 

खिचडी बनविण्याची कृती :


स्टेप १:


  • साबुदाणा 3 ते ४ वेळा चांगला धुवून घ्या जेणे करून त्या मधील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल. 
  • नंतर साबुदाण्यात भिजेल इतके पाणी घालून  ३ ते ४ तास भिजत ठेवा. जेणे करून साबुदाणा फुलून येईल.   
  • बटाट्याच्या पातळ तुकडे (काचऱ्या) कापून घ्या, हिरव्या मिरच्यांचे बारीक बारीक तुकडे करा . 
  • शेंगदाण्याला मंद आचेवर भाजून घ्या. थंड झाल्यावर साल कडून शेंगदाण्याचे मिक्सर मधून जाडसर कूट करून घ्या . 

स्टेप २:

  • आता आधी भिजवलेला साबुदाणा घेऊन त्यात शेंगदाणा कूट, मीठ घालून मिक्स करून घ्या. 
  • कढई मध्ये तूप टाकून त्यात जीर, हिरवी मिरचीचे तुकडे,घालून तळून/परतून घ्या . 
  • नंतर त्यात बटाट्याचे काप/ काचऱ्या टाकून  झाकण ठेऊन २ ते ३ मिनिटे वाफ काढून घ्या. 
  • बटाटा शिजल्यावर त्यात वरील साबुदाण्याचे मिश्रण घालावे. 
  • त्यावर चवी प्रमाणे साखर घालून दूध किंवा ताकाचा हबका मारावा. 
  • आता वर झाकण ठेऊन २ ते ३ मिनिटे वाफ काढावी. खिचडी पारदर्शक झाली की शिजली असे समजावे . 
  • खिचडी शिजल्यावर गॅस बंद करून कोथंबीर आणि ओल खोबरं खवून घालावे व गार्निश करून घ्या.
  • खिचडी दह्याबरोबर सर्व्ह करावे . 
टीप :
  1. साबुदाणा खिचडीत हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल मिरची पावडर ही वापरू शकतो . 
  2. कच्या बटाट्या ऐवजी उकडलेला बटाटा ही वापरू शकतो . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या