भाजणी थालीपीठ रेसिपी हा महाराष्ट्रातील अत्यंत आवडीचा पदार्थ (नास्ता) आहे. जो वेगवेगळ्या धान्यापासून (मल्टि ग्रेन) बनवला जातो, त्यामुळे तो पौष्टीक तर असतोच त्याच बरोबर तो चवीला स्वादिष्ट व रुचकर सुद्धा असतो. धान्य भाजल्यामुळे ते पचायलाही हलके होते .
|
भाजणी थालीपीठ |
|
थालीपीठ भाजणी |
भाजणीचे थालीपीठ
थालीपिठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य :Ingredient of Thalipeeth
- दोन वाटया भाजणीचे पीठ
- दोन चमचे तिखट
- पाव छोटा चमचा हळद
- एक चमचा गरम मसाला
- अर्धी वाटी कांदा
- चवीनुसार मीठ
- कोथींबीर
- एक चमचा आलं-लसूण-मिरची पेस्ट
- एक चमचा सफेद तीळ
- तेल
- ओवा
- आपल्याला आवडेल ती पालेभाजी:(उदा . मेथी,पालक )
भाजणी बनवण्याची कृती :
- थालीपीठ करताना दोन वाटया भाजणीचे पीठ घेऊन त्यात अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा,हळद, ओवा गरममसाला,तिखट,तीळ,आलंलसून पेस्ट,कोंथिबीर,मीठ,बारीक चिरलेली मेथी,दोन चमचे गरम तेल,थोडं थोडं कोमट पाणी घालून पीठ घट्ट भिजवून घ्या .
- एक लहान गोळा घेऊन ओल्या रुमालावर पाण्याच्या हाताने थालीपीठ थापून घ्यावे .
- नॉनस्टिक पॅनवर थोडं तेल टाकून रुमाल वरच्या बाजूला राहील अश्या प्रकारे थालीपीठ पॅनवर टाकावे . नंतर रुमाल हळूहळू काढावा किंवा केळीच्या पानावर /प्लॅस्टिकच्या कागदावर थापून तव्यावर टाकावे . नंतर बोटांनी थालीपिठाला तीन चार भोके पाडा म्हणजे वरून मध्य भागी तेल सोडता येईल .
- बाजूने थोडे थोडे तेल सोडून मंद गॅसवर झाकण घालावे. एक बाजूने खरपूस झाल्यावर उलथन्याने उलटून दुसरी बाजू खरपूस भाजून घ्यावी . उलटल्यावर पुन्हा झाकण ठेवू नये.
- अश्या प्रकारे दोन्हीबाजूने थालीपीठ खमंग भाजून घ्यावी .
- थालीपीठ दह्याबरोबर किंवा लसून चटणी बरोबर सर्व्ह करावीत .
टीप :
- थालीपीठाची भाजणी करताना वरील कोणतेही धान्य कमी जास्त प्रमाण झाले तरी चालेल.
- भाजणी थालीपीठ रेसिपीला थोडी गोडसर चव हवी असल्यास त्यात थोडा गूळ घालावा.
- डाळी आपण जर सालासकट वापरल्या तर थालीपिठ अधिक खमंग व खुसखुशीत होतात .
- कांद्याऐवजी उकडलेला बटाटा ही वापरू शकतो .
- भाजणीच्या पिठाची उकड काढून हि थालीपीठ करता येते .
🌼🌼 थालीपीठा पासून मिळणारे फायदे : Health Benefits of Thalipeeth
- थालीपीठा मध्ये फायबर विपुल प्रमाणात असल्या मुळे पाचन तंत्र सुधारते .
- या मध्ये प्रोटीन / प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
- मुलांच्या वाढीसाठी हा एक परिपूर्ण आणि healthy आहार आहे.
- डायबेटिक/ हृदय विकार असणाऱ्या पेशंट साठी खूप चांगला आहार आहे.
- वेटलॉस मिशनवर असणाऱ्यासाठी हा एक उपयुक्त पदार्थ आहे.
0 टिप्पण्या