खारे-शंकरपाळे रेसिपी: गोड़ शंकरपाळी आपण नेहमीच खातो खास करून दिवाळी मध्ये, पण कित्येक जणांना गोड़ आवडत नाही किंवा ते खाऊ शकत नाहीत. या शंकरपाळ्या आवडीने स्नॅक म्हणून खाणाऱ्यांची संख्या खूप आहे. चला तर मग बनवूया या खास शंकरपाळ्या.
खारे शंकरपाळे रेसिपी
साहित्य :
- एक वाटी मैदा
- एक वाटी बारीक़ रवा
- एक चमचा कॉर्नफ्लोअर
- दोन मोठा चमचे घट्ट तूप
- एक चमचा ओवा भरडलेला
- एक चमचा जीर जाड़सर कुटलेले /कलोंजी
- एक चमचा कसूरी मेथी
- चवीनुसार मीठ
- अर्धी वाटी दही
- चिमुटभर हळद
- तळण्यासाठी तेल
कृती :
- सर्वप्रथम मैदा व रवा एकत्र करुन घ्यावे.
- त्यात घट्ट तूप चांगले फेसून त्याला चोळून घ्यावे .
- नंतर त्यात ओवा,जीर, कसूरी मेथी, कॉर्नफ्लोअर,मीठ, दही,हळद मिक्स करून कमीत कमी पाणी घालून पीठ एकदम घट्ट मळून घ्यावे.
- एक तासानी चांगले कुटून घ्यावे.
- नंतर त्याची साधारण अर्धा इंच जाडसर पोळी लाटून शंकरपाळ्याचा आकारात किंवा लांबट लांबट तुकडे कापून घ्या.
- कढईत तेल तापत ठेवा, मंद गॅसवर शंकरपाळ्याचे तुकडे थोडे थोडे टाकून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.
0 टिप्पण्या