Til-naram-ladoo-recipe in marathi in step by step process (तिळाचे नरम लाडू)

तिळाचे नरम लाडू  : तिळाच्या कडक लाडू प्रमाणे नरम लाडू ही खूप आवडीने आपल्याकडे खालले जातात. बऱ्याच  वेळेला कडक लाडू सर्व जण नाही खाऊ शकत मग पर्याय म्हणून नरम लाडू कोणीही खाऊ शकतात. असे हे लाडू कसे बनवायचे ते आता आपण पाहूया.    

Til-naram-ladoo-recipe in marathi in step by step process (तिळाचे नरम लाडू)


                      तिळाचे नरम लाडू

लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १ कप सफेद तीळ 
  • १ कप साधा गूळ 
  • १ कप शेंगदाणे 
  • १/४ कप डेसिकेटेड कोकोनट 
  • २ चमचे काजू पावडर 
  • २ चमचे पिस्ता/ बदाम पावडर 
  • वेलची पावडर/रोझ इसेन्स 
  • एक चमचा तूप 

लाडू बनविण्याची कृती :

  • प्रथम तीळ निवडून पॅन मध्ये तीळ भाजून घ्या.  
  • थंड करून मिक्सर मधून पावडर करून घ्या. 
  • शेंगदाणे भाजून, साल काढून त्याचीही पावडर करून घ्या. 
  • काजू-पिस्ता हलका भाजून पावडर करून घ्या.  
  • नंतर तीळ पावडर, शेंगदाण्याचे कूट, काजू -पिस्ता पावडर मिक्स करून ठेवा.  
  • जाड बुडाच्या कढईत तूप घालून त्यात गूळ टाकून मंद गॅसवर विरघळवून घ्या . 
  • त्यात वर करून ठेवलेले मिश्रण घालून,वेलची पावडर घालून मिक्स करून परतून घ्या . 
  • सर्व एकजीव झाल्यावर थाळीत काढून हाताला तूप लावून लाडू वळावेत. 
*तिळाचे कडक लाडू रेसिपी साठी click करा.  

टीप :
  1. हे तिलाचे लाडू नरम असल्यामुळे कोणत्याही वयोगतातील व्यक्ती खाऊ शकतो.   
  2. तिळा मध्ये कॅल्शियम खूप प्रमाणात असल्यामुळे शरीरा साठी खूप उपयुक्त असतात.    




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या