how to make til laddu in marathi | tilache ladoo recipe step by step process in marathi

Til Laddu Recipe 


तिळाचे लाडू (tilache ladoo) बनविणे खूप सोप असत, इतर लाडू प्रमाणे हे लाडू बनविण्यासाठी जास्त तयारी करावी लागत नाही.शिवाय तीळ हे कॅल्शियम चा खूप मोठा स्रोत आहे, त्यामुळे तिळाचे वेग वेगळे पदार्थ बनविण्याची  आपल्याकडे प्रथा आहे. महाराष्ट्रात मकरसंक्रातीत विशेषतः तिळाचे लाडू बनवण्याची प्रथा आहे. कारण तीळ हे उष्ण असल्यामुळे थंडीत तीळ खाणे शरीराला पोषक व लाभ दायक असते. 

          

how-to-make-til-ladoo-marathi


                            

👉लाडू बनविण्यासाठी लागणारे साहित्य :Til Ladoo Ingredients 

  • अर्धा किलो सफेद तीळ - Sesame seeds
  • अर्धा किलो चिक्कीचा गूळ - Jaggery
  • ५०ग्रॅम शेंगदाणे - Peanuts
  • ५० ग्रॅम भाजकी डाळ - Roasted Split Chickpeas
  • ५० ग्रॅम सुख खोबर (डेसिकेटेड कोकोनट )- Desiccated Coconut
  • एक चमचा वेलची व जायफळ पावडर /रोझ इसेन्स - Cardamom, Nutmeg Powder 
  • दोन चमचे तूप - Ghee

👉तिळाचे लाडू कसे बनवायचे- कृती :How to Make Til Ladoo

  • प्रथम तीळ साफ करुन घ्या . 
  • एका पॅन मध्ये तीळ घालून हल्के भाजून घ्यावेत व नंतर ते वेगळे काढून ठेवावे.   
  • पॅन मध्ये शेंगदाने भाजून, त्याची साल काढून त्याचे जाड़सर कूट करुन घ्या. 
  • डेसिकेटेड कोकोनट ही थोडे परतून घ्या. 
  • नंतर भाजलेले तीळ, शेंगदाण्याचे कूट, भाजकी डाळ, भाजलेले सुख खोबर सर्व मिश्रण एकत्र करून ठेवावे.    
  • पॅन मध्ये एक चमचा तूप घालून त्यात चिरलेला गूळ घालून विरघळवून घ्या, गुळाचा गोळीबंद पाक करून घ्या. (सतत चमच्याने हलवीत रहा, नाहीतर गूळ जळेल) . 
  • गुळाचा पाक झाला आहे की नाही हे चेक करण्या साठी, एका वाटीत पाणी घेऊन त्यात एक थेंब गुळाचा टाकून बघा, थेंब गोळा घाला तर पाक घाला असे समजावे आणि पाण्यात पसरला तर  पाक थोडा अजून उकळावा.  
  • नंतर लगेच त्या पाकात वर मिक्स करून ठेवलेले मिश्रण व वेलची जायफळ पावडर घालून चांगले मिक्स करावे. 
  • लगेच थाळीत काढून गरम गरम असतानाच हाताला पाणी/तेल लावून तिळाचे लाडू (Til Laddu Recipe ) वळावे. 
  • लाडवाचे मिश्रण थंड झाल्यावर लाडू करणे कठीण जाते, म्हणून गरम गरमच लाडू वळावेत. 

👉टिप : Tips for making Til Ladoo

  1. थंडीच्या दिवसात हे लाडू खाल्यामुळे कॅल्शियम तर मिळतेच, त्याच बरोबर शरीरातील तेलाची कमतरताही भरून निघते. 
  2. सफेद तिळा प्रमाणेच आपण काळ्या तिळाचे ही असेच लाडू करू शकतो . 
  3. जर एकदम लाडू वळायला त्रास होत असेल तर मिश्रणाचे दोन भाग करून लाडू वळावेत. 
  4. काही जणांना कडक लाडू खाता येत नाहीत त्यांच्या साठी तिळाचे नरम लाडू बनविता येतात.   

👉अन्य स्वादिष्ट रेसिपी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या