Fresh Coconut Burfi Sweet Recipe

ओल्या नारळाची चविष्ट रुचकर वडी (olya naralachi vadi recipe) आपण घरच्या घरी अगदी सहजतेने बनवू शकतो. नारळाची वडी बनवायला अगदी सोपी असते व ती कमी साहित्यात बनवू शकतो. नारळाची वडी आपण दोन्ही प्रकारे म्हणजेच गूळ किंवा साखर टाकून बनवू शकतो. हेल्थ कॉन्शियस मंडळी गुळा पासून बनवलेल्या नारळाच वडी जास्त पसंद करतात. ही  वडी (coconut sweets recipe)बनवून ठेवायचं झाल्यास १० ते १५ फ्रिज मध्ये अगदी सहज राहू शकतात. चला मग बनवूया ओल्या नारळाची स्वादिष्ट रुचकर वडी.   




👉नारळाच्या वड्या बनवण्यासाठीचे साहित्य : Ingredients for Coconut Burfi 

  • २ कप खवलेलं ओल खोबरं (fresh coconut)
  • १ कप साखर (sugar)
  • १/२ कप दूध /मलई (milk/cream)
  • १/२ टी.स्पून वेलची-जायफळ पावडर(cardamom-nutmeg powder)
  • साजूक तूप  (ghee)


👉नारळाच्या वड्या बनवण्याची कृती : How to Make Coconut Barfi  


स्टेप १:
  • प्रथम नारळाच्या वाट्या खवून घ्यावा किंवा सुरीने बारीक तुकडे करून घ्या .   
  • खवलेल्या नारळात काळपट भाग असल्यास काढून टाका. 
  • खवलेले खोबर थोडे मिक्सर मधून फिरवून घ्या. 
  • थाळीला तूप लावून चांगले पसरून घ्यावे. वाटीला पृष्ठभागावर तूप लावून ठेवावे. 
स्टेप २:
  • एका जाड बुडाच्या कढईत किंवा पॅन मध्ये १ चमचा तूप घालून त्यावर खवलेले खोबर मंद आचेवर परतून घ्या. 
  • २ मिनिट परतल्यानंतर त्यात दूध आणि साखर घालून चांगले मिक्स करून घ्या. 
  • मिश्रण सतत चमच्यानी ढवळत रहावे. हळूहळू साखर विरघळून मिश्रण थोडे पातळ होईल.
  • मिश्रणात वेलची-जायफळ पावडर घालून मिक्स करावे.  
  • दूध आणि साखर आटवून मिश्रण घट्ट होऊन गोळा होत आला की गॅस मंद करून घ्या. 
  • मिश्रण पूर्णपणे भांडयाच्या कडा सुटून गोळा झाला की गॅस बंद करावा.
स्टेप ३:
  • मिश्रण नरम असतानाच ते सेट करण्यासाठी बटर पेपेर किंवा (तूप लावून ग्रीसिंग केलेल्या) डिश मध्ये ट्रान्सफर करायचे आहे. 
  • मिश्रण थंड झाल्यास ते व्यवस्थित सेट करता येणार नाही त्यामुळे व्यवस्थित वड्या पाडता येणार नाहीत. 
  • तुपाने ग्रीसिंग केलेल्या थाळीत साधारण १/२ इंच जाडीचे हे तयार केलेले खोबऱ्याचे मिश्रण ओतून तूप लावलेल्या वाटीने समतल पसरून घ्यावे. 
  • वड्या जितक्या जाड हव्या आहेत त्याप्रमाणे मिश्रणाचा थराची जाडी ठेवावी. 
  • मिश्रण गरम असतानाच तूप लावलेल्या सुरीने चौकोनी किंवा षटकोनी आकाराचे हलक्या हाताने चिरा/निशाण करून ठेवावे.  
  • थंड झाल्यावर सर्व तुकडे (वड्या) वेग वेगळे करून हवाबंद डब्या मध्ये ठेवावे व आपल्याला हवा तेव्हा या रुचकर व स्वादिष्ट नारळाच्या वड्याचा (fresh coconut burfi sweet recipe )आस्वाद घ्यावा.   

👉टिप : Tips for making Coconut Burfi 

  • ओल्या नारळाची वडी रंगीत हव्या असल्यास थोडे दुधात केसर घालून किंवा बीटरूट रस घालून वड्या कराव्यात . 
  • नारळाच्या वडीत गुलाब किंवा केवडा इसेन्स ही घालू शकतो . 
  • नारळाच्या वड्या जास्त गोड आवडत असल्यास साखरेचे सम प्रमाण घेऊ शकता. 
  • वडीत ड्रायफ्रुट्स आवडत असल्यास घालू शकतो किंवा चांदीचा वर्ख ही लावू शकतो.  
👉 अन्य रुचकर रेसिपी साठी खालील लिंकवर क्लिक करा.