Besan Burfi Recipe in Marathi 

बेसन बर्फी/वडी सहज सोपी रेसिपी आहे. ही बर्फी (besan vadi) चवीला रुचकर व स्वादिष्ट लागते. कधीही झटपट आणि कमी साहित्यात बनणारी बेसन बर्फी . त्यामुळे बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा कधीही घरी मिठाई बनवणे श्रेयस्कर ठरते. चला बनवूया हेल्दी आणि स्वादिष्ट बेसन बर्फी.




 

👉बेसनाच्या वडी साठी लागणारे साहित्य:Ingredient for Besan Burfi


१) चार वाट्या चण्याचे जाडसर पीठ
२) एक वाटी तूप
३) दोन वाट्या साखर
४) 1/4 चमचा वेलची पूड
५) 1/4 चमचा जायफळ पूड
६) 8-10 बदाम पिस्त्याचे काप

👉बेसनाची वडी बनवण्याची विधी- कृती: How to Make Besan Barfi


१) प्रथम जाड बुडाच्या कढईत घेऊन गरम करत ठेवा. कढ़ई गरम झाल्यावर बेसन घालून 2-3 मिनिट कोरडेच मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या. 
२) नंतर त्यात थोडे-थोडे करून त्यात तूप घालून बेसनाचा रंग बदले पर्यंत भाजून घ्या.  
३) पिठाचा कच्चेपणाचा वास जाऊन भाजल्यानंतर येणाऱ्या खमंग वास येईपर्यंत भाजावे. नंतर गॅस बंद करून भाजलेले पीठ बाजूला काढून ठेवावे.
४) आता कढईत दोन वाट्या साखर व एक वाटी पाणी घालून साखर विरघळून घ्या. 
साखर पूर्ण पणे विरघळल्यानतंर एक तारी पाक करून घ्या .दोन बोटांमध्ये पाक लावून तार चेक करून घ्या. 
नंतर त्यात वेलची पूड जायफळ पूड आणि भाजलेले बेसनाचे पीठ घालून एकजीव करुन घ्यावे.
४) हे सर्व मिश्रण चांगले 2 मिनिट घोटून त्याचा गोळा होत आल्यावर तुपाने ग्रीसिंग केलेल्या ताटात किंवा केक टिन मध्ये मिश्रण ओतून आवडीप्रमाणे थापावे.
५) वरून बदाम-पिस्त्याच्या कापाने गार्निशिंग करून घ्यावे. सुकामेवा हलक्या हाताने चमच्याने दाबून घ्या. 
जेणेकरून वड्या कापल्यानंतर सुकामेवा निघणार नाही. 
मिश्रणाचा डबा एकदा चांगला टॅब करून घ्या म्हणजे मिश्रण चांगल्या प्रकारे सेट होईल. 
६) हे थापलेले मिश्रण थोडे सुकत आल्यावर हलक्या हाताने सुरीच्या सहाय्याने वड्या पाडण्यासाठीचे काप द्यावे.
पाक चांगला चिकट झाला असेल तर 2 तासात वड्या चांगल्या आळून चांगल्या वड्या पडतात. 
नाहीतर वड्या आळायला थोडा जास्त वेळ लागतो.
७) हे मिश्रण थोडे ओले असतानाच काप द्यावे कारण एकदा का मिश्रण सुकले की त्यावर काप देणं थोड कठीण जात व वड्या व्यवस्थित आकारात पडत नाहीत.
८) हे मिश्रण व्यवस्थित सुकल्यावर त्याच्या वड्या(Besan Burfi Recipe) वेगळ्या करून एअरटाईट डब्यांमध्ये भरून ठेवाव्यात व हवा तेव्हा त्याचा आस्वाद घ्यावा.

👉टीप:Tips for Besan Burfi
१) तुम्ही बेसन बर्फी/वडीवर गार्निशिंगसाठी डेसिकेटेड कोकोनट /खसखस/ सुखा मेवा, चांदीचा वर्ख सुद्धा वापरू शकता.
२) वडी मध्ये आवडत असल्यास तुम्ही केसर सुद्धा वापरू शकता.
३)वडी मध्ये साखरे ऐवजी शुगर फ्री किंवा गूळ सुद्धा वापरू शकता.(फक्त गुळामुळे वडीचा रंग थोडा बदलण्याची शक्यता असते. )
४) बेसनाचे जाडसर पीठ नसेल तर 1चमचा रवा घालून बर्फी करावी. म्हणजे वडीचे टेक्सचर चांगले येते.


👉अन्य रुचकर रेसिपी साठी खालील लिंकवर क्लिक करा.