व्हेजिटेबल कुर्मा व्हेजिटेबल कुर्मा रेसिपी ही सबंध भारतात खुप पॉपुलर रेसिपी आहे, व्हेज कुर्मा विविध भाज्याचा वापर करुन बनवली जाणारी व सर्वांच्या खूप आ व रेसिपी ही सबंध भारतात खुप पॉपुलर रेसिपी आहे, व्हेज कुर्मा विविध भाज्याचा वापर करुन बनवली जाणारी व सर्वांच्या खूप आवडीची भाजी आहे. विशेषप्रसंगी सण-समारंभात,पार्टीज मध्ये आवर्जून या भाजीचा समावेश असतो. चला मग बनवूया ही सर्वांची फेव्हरेट रेसिपी.  

how to make vegetable-kurma-recipe step by step in marathi


                     व्हेजिटेबल कुर्मा रेसिपी 

साहित्य :

  • १ वाटी कॉलीफ्लॉवर
  • १ वाटी मटार 
  • १/२ वाटी गाजर, फरसबी 
  • १ मध्यम आकाराचा कांदा 
  • २ टोमॅटो 
  • ४ हिरव्या मिरच्या 
  • १ छोटा चमचा आले लसूण पेस्ट 
  • १/२ वाटी ओल खोबर 
  • २ मध्यम बटाटा 
  • १ १/२ चमचा लाल तिखट 
  • १/२ छोटा चमचा गरम मसाला
  • १/२ छोटा चमचा किचन किंग मसाला  
  • १/२ चमचा धने पावडर 
  • ५ काजू, एक चमचा भाजलेली खसखस 
  • १/४ छोटा चमचा हळद 
  • स्वाद नुसार नमक 
  • कोथींबीर 
  • फोडणीसाठी तेल/तूप 
  • जिरं ,मोहरी
  • चिमूटभर हिंग,४-५पाने कडीपत्ता,१ तमालपत्र 

कृती :

  • फ्लॉवरचे तुरे काढून घ्यावेत. गरम पाण्यात मीठ टाकून त्यात तुरे पंधरा मिनिटे ठेवावेत. नंतर साध्या पाण्याने धुवून घ्यावेत . 
  • खोबर, मिरची, काजू, खसखस,थोडी कोथींबीर एकत्र वाटून पेस्ट वाटून घ्यावी. 
  • कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. फरसबी,गाजरचे,बटाटयाचे तुकडे करून घ्या.  
  • पॅन मध्ये तेल, मोहरी, जिर,तमालपत्र,कडीपत्ता, हिंग टाकून परतून घ्या.  नंतर त्यावर चिरलेला कांदा घालून हल्का लालसर परतून घ्या.
  • कांदा परतल्यानंतर त्यात चिरलेला टोमॅटो घालून मऊसर शिजवून घ्या. 
  • नंतर आल लसून पेस्ट, वाटलेला मसाला, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने पावडर, किचन किंग मसाला टाकून तेल सुटे पर्यंत परतत रहावे. 
  • तेल सुटल्यानंतर त्यात फ्लॉवरचे तुरे, मटार, फरसबी, गाजर, बटाटयाचे तुकडे, मीठ घालून परतून घ्या. त्यात पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्या . 
  • गरमागरम व्हेज कुर्मावर वरून कोंथिबीर घालून पूरी बरोबर सर्व्ह करावे. 
टीप : 

१) व्हेजिटेबल कूर्मा बनवण्यासाठी आपण आपल्या आवडी नुसार कमी जास्त प्रमाणात भाज्या वापरू शकतो.