puran poli recipe in marathi | recipe for puran poli in marathi| health benefits of puran poli

Puran Poli recipe in Marathi


महाराष्ट्रीयन पुरणपोळी रेसिपी: प्रत्येक मराठी घराघरात सणासुदीला आवर्जून बनवला जाणारा आवडीचा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे.  महाराष्ट्रातील कोणाला पुरणपोळी माहीत नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. अशी ही खास स्वादीष्ट व रुचकर पुरणपोळी पोळी आज आपण बनवूया.  




puran poli recipe in marathi
PURAN POLI RECIPE 


                                पुरणपोळी 


पुरण बनविण्यासाठी लागणारे साहित्य : Puran poli Ingredients 

  • एक वाटी चणाडाळ 
  • अर्धी वाटी गूळ 
  • अर्धी वाटी साखर 
  • चिमुटभर हळद 
  • एक चमचा तेल 
  • एक टी स्पून वेलची जायफळ पावडर 

पोळीसाठी लागणाऱ्या कणिके साठीचे साहित्य:

  • एक वाटी मैदा 
  • एक वाटी गव्हाचे पीठ 
  • चार चमचे तेल 
  • तूप 
  • चिमुटभर हळद 
  • स्वादानुसार मीठ 
  • तांदळाचे पीठ 

स्टेप १: पुरण बनवण्याची विधी :How to Make Puran Poli Stuffing


  • चण्याची डाळ चांगली धुऊन दोन ते तीन तास भिजत ठेवा. (डाळ भिजल्यामुळे लवकर शिजली जाते ). 
  • डाळ भिजल्यानंतर एका भांडयात डाळ व तिच्या दुप्पट पाणी घालून, त्यात एक चमचा तेल,चिमुटभर हळद, थोडं मीठ टाकून कुकर मधून तीन शिट्या करून शिजवून घ्या. 
  • डाळ चांगली शिजल्यावर चाळणीवर उपसून त्यातील अतिरिक्त पाणी काढून घेणे, त्या गाळलेल्या पाण्यास पुरणाचा कट म्हणतात .  
  • नंतर मंद गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये शिजलेली चण्याची डाळ, साखर व किसलेला गूळ घालून चांगले मिक्स करून शिजवून घ्या .  
  • शिजवताना हे मिश्रण करपू नये म्हणून मध्ये मध्ये चमच्याने हलवत रहावे. गूळ विरघळल्यावर डाळीला पाणी सुटते मग ते पूर्णपणे आटवून हे मिश्रण कोरडे करून घ्यावे.   
  • डाळीचे मिश्रण चांगले कोरडे झाल्यावर त्यात वेलची जायफळ पावडर घालून चांगले मिक्स करून घ्या.
  • नंतर मिश्रण मिक्सर किंवा पुरणयंत्रातून गरम-गरम असतानाच बारीक वाटून घ्या.गरम असतानाच पुरण वाटले की पुरण लवकर बारीक वाटले जाते .  
  • अश्याप्रकारे पुरण (सारण)(puran poli stuffing) तयार झाले . 

स्टेप २: पूरन पोळी बनवण्याची विधी :How to Make Puran Poli

  • सर्वप्रथम परातीत मैदा आणि गव्हाचे पीठ बारीक चाळणीने चाळून घ्या.   
  • नंतर त्यात चवीनुसार मीठ,चिमूटभर हळद, तेल टाकून मिक्स करून अंदाजाने पाणी टाकून कणिक सैलसर मळून तेल लावून तशीच तिंबून दोन ते तीन तास ठेवावी.
  • कणिक दोन ते तीन तास चांगली भिजल्यानंतर तेलाच्या हातांनी चागंली मळून हल्की करून घ्यावी. 
  • नंतर मळलेल्या पिठाची पुरीच्या गोळी एवढी गोळी घेऊन त्याला वाटीचा आकार देऊन त्यात कणकेच्या गोळीच्या साधारण दुप्पट आकाराचा पुरणाचा गोळा मधोमध भरुन हलक्या हाताने चारी बाजूने पारी बंद करून घ्या .
  • पुरण पिठाच्या गोळयातुन बाहेर येता कामा नये. 
  • पिठाचा तयार गोळ्याला बाहेरून तांदळाच्या पिठाचा हात लावावा म्हणजे गोळे लवकर होतात. 
  • पोळपाटावर तांदळाच्या पीठावर पोळी हलक्या हाताने चारीबाजूने समान लाटून घ्या . 
  • पोळी लाटून झाल्यावर लाटण्याभोवती गुंडाळून घ्यावी आणि पॅनवर टाकावी आणि पोळीच्या वरच्या पृष्ठभागावरचे जास्तीचे पीठ मऊ रुमालाने काढून टाकावे . 
  • नॉनस्टिक पॅनवर थोडे तूप घालून त्यावर पुरणपोळी मध्यम आचेवर खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्या . 
  • तयार पुरणपोळी तूप व दुधा बरोबर सर्व्ह करा. 

टीप :Tips to make soft puran poli recipe 

  1. चण्याची डाळ शिजवल्यानंतर उरलेले पाणी कटाच्या आमटीसाठी वापरू शकतो. 
  2. पुरणाची पोळी पंधरा दिवस आरामात फ्रिजमध्ये राहते. 
  3. पुरण आधी करून ठेवल्यास ८ दिवस टिकू शकते.  
  4. पुरणपोळी पूर्ण मैद्याची किंवा पूर्ण गुळाची ही करू शकतो . 
  5. मैद्याच्या पिठाची पोळी करायला सोपी असते,कारण ती सहज लाटली जाते आणि सहसा फाटत नाही. 
  6. चण्याच्या डाळीच्या जागी मुगडाळ किंवा तूरडाळ ही वापरू शकतो . 
  7. पुराणात पाण्याचा अंश राहील्याने पुरण कणकेच्या पारीत भरली असता लाटताना पुरण बाहेर येते. म्हणुन पुरण बरोबर झाले आहे हे चेक करण्यासाठी पूरणामध्ये झारा उभा केला असता थोडा वेळ तसाच उभा राहिला तर असे समजावे की पुरण वाटण्यासाठी तयार झाले असे समजावे. 
🌼 पूरणपोळी पासून मिळणारे  फायदे : Health Benefits of Puranpoli 

👉गहू व डाळीच्या पासून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन प्राप्त होतात जे हाय क्वालिटी प्रोटीन मानला जातात. या पासून आपल्या शरीराला अमिनो ऍसिडची पूर्ती होते जे आपल्या शरीराला विविध कारणासाठी खूप आवश्यक असते.
  
👉यामध्ये असलेला गुळ आपल्या शरीरासाठी खूप लाभकारक आहे,गुळा मध्ये विपुल प्रमाणात लोह, कॅल्शिअम,पोटॅशिअम असते ज्यामुळे पचनतंत्र सुधारण्यास उपयुक्त आहे. गूळ क्षारीय होऊन पचनास लाभकारी ठरतो.

👉तूप हे आपल्या आरोग्याला खूप गुणकारी असते. पचनास उपयुत असतेच त्याबरोबर त्वचेचा कांती सुधारते. हार्मोन्स,मेंदूच्या कार्यासाठी तसेच आपल्या शरीराच्या एकूणच पोषणासाठी तूप खूप उपयुक्त असते. 

👉चणाडाळीत भरपूर प्रमाणात आयन, झिंक,कॅल्शियम,प्रोटीन,फोलेट असल्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा त्यातून प्राप्त होते व हिमोग्लोबीनची मात्रा सुधारते.       


🌼 काही अन्य पाककृती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा . 




👉 मूगडाळीचा पौष्टिक व रुचकर हलवा रेसिपी पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.                      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या