How to make instant-moong-dal-halwa recipe in marathi

इन्स्टंट मुग डाळीचा हलवा पचायला हलका व पौस्टिक तत्वांनी भरपूर असतो. खास करून थंडी मध्ये हा हलवा खाल्ला जातो. मुग डाळी पासून बनवल्यामुळे मुगाच्या डाळी मध्ये असणारे प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन, मिनरलचा फायदा आपल्याला मिळतो. तर मग चला बनवूया इन्स्टंट पौस्टिक मूग डाळीचा हलवा. 


Instant moong dal halwa


                     इन्स्टंट मुग डाळीचा हलवा

साहित्य :

  • १ वाटी मुगडाळ 
  • १ वाटी  साखर 
  • एक वाटी तूप 
  • १ १/२ वाटी सायीचे दूध 
  • १/२ वाटी खवा 
  • १/२ छोटा चमचा जायफळ वेलची पूड 
  • केसर /फ़ूड कलर 
  • बेदाणे 
  • काजू, बदाम 
  • चारोळी 

बनवण्याची कृती :

स्टेप १ :

  • मुगाची डाळ स्वच्छ धुवून, थोडी वाळवून घ्या. नंतर कोरडीच कढईत परतून घ्या.  
  • नंतर मुगाची डाळ मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या. 
  • काजू, बदामाचे पातळसर काप करून घ्या. 
  • खवा थोडया तुपावर परतून घ्या, वेगळा ठेवा. 
  • तुपावर काजू , बदाम,चारोळी थोडे परतून घ्या.
  • थोडया दुधात केसर भिजत ठेवावे. 

स्टेप २ : 

  • पॅनमध्ये तूप टाकून नंतर त्यात जाडसर वाटलेली मूगडाळ मंद गॅसवर खरपूस सोनेरी रंग येई पर्यंत भाजून घ्या. 
  • भाजल्या नंतर त्यात गरम दूध, साखर घालून मोकळा होई पर्यंत परतत रहा.
  • सतत परतत रहावे, नाहीतर करपण्याची शक्यता असते.      
  • नंतर त्यात दुधात भिजवलेले केसर मिक्स करून एक वाफ आणावी.
  • गॅस बंद करून भांडे खाली उतरवून घ्या. 
  • हलवा चांगला मोकळा झाल्यावर त्यात तुपावर परतलेले काजू,बदाम,चारोळी,बेदाणे,वेलची पावडर घालावी. 
  • नंतर तुपावर परतलेला खवा घालून चांगले मिक्स करून घ्या, अश्या प्रकारे मूगडाळीचा हलवा तयार आहे.  
  • सर्व्ह करताना त्यावर चांदीचा वर्ख ही लावू शकतो. 

टिप :

  • मुगाची डाळ पचायला हलकी असल्यामुळे लहान मुलानं पासून मोठया माणसांपर्यंत सगळ्यांना पोषक, प्रोटीनयुक्त असते. 
  • इन्स्टंट मुग डाळीचा हलवा करायलाही सोपा आहे, त्यामुळे मूगडाळीचा रवा करून ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हलवा करू शकतो. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या