आंब्याचा मुरांबा:  कैरीचा आंबट गोड मुरंबा कोणाला आवडत नाही. लहानापासून मोठ्यानं पर्यंत सर्वाना मुरांबा आवडतो. तो आपण चपाती, ब्रेड बरोबर खाऊ शकतो किंवा नुसता असाच खाल्ला तरी मुरांब्याची चव लाजवाब लागते. 

कैरीमध्ये भरपूर प्रमाणात "एंटीऑक्सिडेंट "आयरन, "व्हिटॅमिन सी", "क","ई "आणि खनिजे असल्यामुळे कैरी आपल्या आरोग्यासाठी लाभकारी असते. कैरीचा मुरंबा खाल्ल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मध्ये सुधार होण्यास मदत होते. आपली पचन संस्था सुधारून बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. कैरी मध्ये विपुल प्रमाणात आयरन असल्यामुळे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनच्या स्तरामध्ये सुधार होतो. मुरांब्याचे सेवन केल्याने शरीर मजबूत व तंदुरुस्त होण्यास मदत होते. 

चला मग बनवूया आंबट गोड चवीचा व स्वास्थवर्धक कैरीचा मुरांबा.

Kairi-Raw-Mango-Murabba-recipe in marathi
आंब्याचा मुरांबा 



                       आंब्याचा मुरांबा  

आंब्याचा मुरांब्यासाठीचे  साहित्य : Ingredients of Raw Mango Murabba

  • एक किलो आंबे (कैरी) 
  • एक किलो साखर 
  • थोडे केशर 
  • वेलची पूड 
  • लवंग,दालचिनी आवडीप्रमाणे 
  • चिमूटभर मीठ 

आंब्याचा मुरांबा बनविण्याची कृती : How to Make Raw Mango Murabba

  • सर्व प्रथम कच्ची कैरी घेऊन एक तासभर पाण्यात भिजत ठेवा.
  • एक तासानंतर स्वच्छ धुऊन कपड्याने पुसून कोरडी करून घ्या.  
  • नंतर त्याची साल काढून किसून घ्या किंवा लांब लांब तुकडे करून घ्या. 
  • आता किसलेल्या कैरीचा कीस कुकरच्या डब्यात मध्ये ठेऊन तीन शिटया करून वाफवून घ्या.
  • नंतर एका पॅनमध्ये किंवा जाड बुडाच्या भांडयामध्ये वाफवलेला कैरीचा किस, साखर, लवंग,दालचिनी घालून मंद गॅसवर शिजत ठेवा. 
  • कैरी आणि साखरेचे मिश्रण (साखर पूर्णपणे विरघळत नाही तो पर्यंत) सतत ढवळत राहा.   
  • साखर विरघळल्या नंतर मिश्रणाला पाणी सुटेल ते पूर्ण आटे पर्यंत मंद गॅसवर शिजवत राहा.
  • मिश्रण बेताचे घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड,केशर,मीठ घालून चांगले मिक्स करा. 
  • नंतर गॅस वरून उतरून थंड होऊ द्या. 
  • अश्या प्रकारे मुरांबा तयार आहे. थंड झाल्यावर कोरडया बरणीत भरून घट्ट झाकण लावून ठेवा. 
  • पूर्ण वर्षभर हा मुरंबा सहज टिकतो व अश्या या स्वादिस्ट मुरंब्याचा आस्वाद संपूर्ण वर्षभर तुम्ही घेऊ शकता.  

टिप: Tips

  1. कैरी जर जास्त आंबट असतील तर साखरेचे प्रमाण वाढवू शकतो. 
  2. साखरेचा एक तारी पाक करून त्यात शिजवलेला कैरीचा किस घालून घट्ट होईपर्यंत शिजवून ही मुरांबा करता येतो. 
  3. कैरी किसून किंवा फोडी करूनही आंब्याचा मुरांबा करता येतो. 

बहुगुणी पौस्टिक आवळ्याचा मुरंबा रेसिपी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


खमंग खुशखुशीत थालीपीठ रेसिपी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.