आवळा मुरंबा हा खूप पौस्टिक व पाचक पदार्थ असून सर्वानाच तो आवडतो. आयुर्वेद मध्ये आवळ्याला अनन्य साधारण महत्व आहे. चला मग अश्या व्हिटॅमिन सी, ऍन्टीऑक्सिडेंट,ऍन्टीएजिंग प्रॉपर्टीस ने भरपूर असलेल्या बहुगूणी आवळ्याचा मुरांबा बनवूया.
आवळा मुरंबा
साहित्य :
- अर्धा किलो आवळे
- 750 ग्राम साखर/गूळ
- केसर
- वेलची पावडर
- चुना, तुरटी
- एक ग्रॅम सायट्रिक ऍसिड किंवा लिंबू रस
- दोन ग्रॅम सुंठ पावडर/काळीमिरी
कृती :
- मुरंबा बनविण्यासाठी मोठे मोठे आणि तयार (जुन) थोडे लालसर आवळे घ्या.
- आवळ्याला सुरीने किंवा एखाद्या टोकेरी वस्तूने(काट्याने) लहान लहान टोचे करून घ्या.
- एका पातेल्यात पाणी घेऊन पाव चमचा तुरटी,थोडा चुना घालून मिक्स करून घ्या.
- नंतर त्या पाण्यात टोचे मारलेले आवळे पूर्ण पाण्यात बुडतील असे ठेवा.
- आवळे रात्रभर त्या पाण्यात भिजत ठेवा.
- सकाळी आवळे पाण्यातून काढून स्वच्छ पाण्याने धुऊन,पुसून घ्या.
- नंतर कुकर मध्ये एका डब्यात आवळे ठेऊन (डब्यात पाणी न टाकता), डबा बंद करून एक शिटी करुन घ्या.
- किंवा एका पातेल्यात पाणी उकळायला ठेऊन, पाण्याला उकळी आल्यावर त्यावर चाळण ठेऊन त्या चाळणीवर आवळे ठेऊन शिजवून घ्या.
- आवळे शिजल्यानंतर त्याच्या बिया काढून घ्या किंवा असेच अख्खे ठेवले तरी चालतात.
- नंतर एका भांडयात साखर आणि साखर बुडेल एवढे पाणी घालून मंद गॅसवर ठेऊन एकतारी पाक करून घ्या.
- नंतर त्यात आवळे टाकून सोनेरी रंग येई पर्यंत शिजवून घ्या.
- सोनेरी रंग आल्यावर त्यात वेलची पावडर, सुंठ पावडर, केसर, सायट्रिक ऍसिड टाकून चांगले मिक्स करा.
- थंड झाल्यावर हवाबंद काचेच्या बरणीत पाका सकट आवळे भरून ठेवा.
- अश्याप्रकारे स्वादिष्ट व पौस्टिक आवळ्याचा मुरांबा तयार करता येतो.
टिप :
- आवळ्याच्या मुरंब्याला (मोरावळा) असे ही म्हणतात.
- कोणत्याही प्रकारच्या पित्तावर अत्यंत गुणकारी असा हा मोरावळा रोज एक तरी खाल्ला पाहिजे.
- पाकात आवळे पूर्ण बुडाले पाहिजेत.
- आवळ्याला कुकर मध्ये जास्त शिजवू नका, नाही तर ते तुटतील.
➤ क्रिस्पी खारे शंकरपाळीची रेसिपी पाहण्यासाठी येथे click करा
➤खमंग रुचकर अळूवडी रेसिपी पाहण्यासाठी येथे click करा.
0 टिप्पण्या