Homemade Herbal Tea| Tulsi Ginger Tea | Herbal Tea with Health Benefits in Marathi

होममेड हर्बल टी :

हर्बल-टी पिण्याचे असंख्य फायदे आहेत आणि सध्याच्या धावपळीच्या युगात आपल्या शरीरावर, वाढते प्रदूषण, ताणतणाव, दगदग, बदलती जीवनशैली,खाण्याच्या चुकीच्या सवयी या सर्वांचे दुष्परिणाम शरीरावर तर होतच असतो. मग अश्यावेळी शरीराला आतून मजबूत राखण खूप आवश्यक आहे. अश्यात प्राकृतिक हर्बल चहाच्या सेवनाने शारीरिक दृष्ट्या निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी हा चहा विशेष उपयुक्त आहे.हर्बल चहा मध्ये समाविष्ट घटकांच्या असणाऱ्या नैसर्गिक उपचार गुणधर्मामुळे,सर्दी,खोकल्या,ज्वर या सारख्या सामान्य समस्यांमध्ये तर उपयुत आहेच पण आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राखण्यास खूप फायदा होतो. 

सामान्य चहा तर आपण नेहमीच पितो पण तो चहा आरोग्याच्या दृष्टिकोनातून जास्त उपयुक्त नाही. सामान्य चहाच्या अतिसेवनाने आपल्याला असिडिटी,पित्त,बद्धकोष्ठता,अनिद्रा, बेचैनी सारखे दुष्परिणाम कालांतराने दिसायला लागतात.

होममेड हर्बल-टी आपल्याला सामान्य चहा प्रमाणे तजेला तर देईलच पण त्याच बरोबर आपल्या शरीर स्वास्था साठी खूप लाभकारी आहे. काही पाश्चिमात्य देशामध्ये तर हर्बल चहा रोज नित्याने व आवर्जून पिला जातो व त्यांना त्याचे खूप लाभही  मिळाले आहेत. या हर्बल चहा मध्ये वापरल्या गेलेल्या प्रत्येक आयुर्वेदिक घटकांमुळे हा चहा अत्यंत गुणकारी होतो. तुळस,आल,पुदिना,चहाची पात,अगदी मिरपूड आणि दालचिनी ही सर्व आरोग्यासाठी अत्यंत उत्तम आणि कोणत्याही प्रकारचा आजार होण्यापासून बचावासाठी उत्तम आहेत.  

हर्बल चहा आपण घरातील स्वयंपाक घरातच मिळणाऱ्या वस्तू पासून बनवली जातो व याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, उलट याचा समावेश आपण नित्य नियमाने केल्यास आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आपल्या सर्व सामान्य समस्या सर्दी,खोकला पासून ते रक्तदाब, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी असे भरपूर फायदे या चहाच्या सेवनामुळे आपल्याला मिळू शकतात.    


Homemade Herbal Tea
Homemade Herbal Tea

           

 होममेड हर्बल टी


हर्बल चहासाठीचे साहित्य: Herbal Tea Ingredients 

  • ५-७ तुळशीची पाने                    
  • चहाची पात अंदाजाने 
  • १/२ छोटा चमचा जिरं 
  • १ छोटा चमचा धने 
  • १ छोटा चमचा बडीशेप 
  • १ छोटे चमचे मध (ऑप्शनल)
  • २ कप पाणी 
  • १ वेलची 
  • १ इंच आल्याचा तुकडा 
  • २-३ काळीमिरी 
  • १/२ इंच दालचिनीचा तुकडा 
  • २-३ लवंग 

हर्बल चहा बनविण्याची कृती :

  1. सर्वप्रथम एका चहा बनवण्याच्या भांड्यात पाणी घेऊन, त्यात आलं किसून घालावे व  ५ मिनिट चांगले उखळून घ्यावे. 
  2. नंतर त्यात चहाच्या पातीचे बारीक बारीक तुकडे करून घाला. 
  3. या दोन्ही गोष्टी एकत्र उकळल्याने त्याचा अर्क चांगल्या प्रकारे पाण्यात उतरतो. 
  4. त्यानंतर जिरं,धने, वेलची, बडीशेप,लवंग,काळीमिरी, दालचिनी हे सर्व साहित्य खलबत्यातून जाडसर कुटून घ्यावे. 
  5. जाडसर कुटलेले हे मसाले त्या उकळत्या पाण्यात घालावे. 
  6. त्यानंतर त्याच्यात तुळसीची पाने घालून उकळून घ्यावे. 
  7. हा चहा चांगल्या प्रकारे उकळून त्यातून छानसा ऍरोमॅटिक सुगंध येऊ लागेल. 
  8. मग गॅस बंद करा. 
  9. या चहा मध्ये दुधाचा वापर केला जात नाही. 
  10. नंतर चहा गाळून त्यात स्वादासाठी मध घालून मिक्स करा. 

टिप : Tips 

  1. जर तुम्हाला सर्दी, खोकला झाला असेल तर या होममेड हर्बल टीचा खूप लाभ होईल .    
  2. सर्दी असेल तर कालीमिरी, लवंगची मात्र थोडी जास्त टाकली तरी चालेल.  
  3. अन्य वेळेला लवंग, काळीमिरीची मात्र तुमच्या गरजे प्रमाणे कमी जास्त करू शकतो.  
  4. यात आपणास वाटले तर, बेल, पारिजात, जास्वंदीची पाने,पुदिन्याची पाने सुद्धा टाकू शकतो. यामुळे या हर्बल चहाच्या हीलिंग गुणधर्मात वाढ होईल. 
  5. साधारण चहाच्या ऐवजी हा हर्बल चहा आरोग्याच्या दृष्टीकोणातून खूप लाभकारी आहे.  
🌼 अन्य रेसिपीस पाहण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा .

👉 पौष्टिक व स्वादिष्ट आवळ्याचा मुरंबा रेसिपी पाहण्यासाठी या लिंक वरती क्लिक करा. 

👉रुचकर व खुसखुशीत अळूवडी रेसिपी पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 

🌼 होममेड हर्बल टी -चहाचे आरोग्यस होणारे फायदे | Health Benefits Of  Herbal Tea


👉 तोंडाचा दुर्गंध : तुलसी यामध्ये असलेल्या अँटी बैक्टीरियल व अँटिऑक्सिडेन्ट प्रॉपर्टीस तोंडामध्ये        दुर्गंध निर्माण करणाऱ्या विषाणूंना कमी करतात व तोंडाच्या/ हिरड्यांच्या इतर आजारा पासून बचाव करतात.

👉 रोगप्रतिकारक शक्ती  : आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीराला आतून स्वस्थ व मजबूत करण्यास खूप उपयुक्त आहे.

👉 पाचन तंत्र: हर्बल-टी मुळे आपल्या पाचन तंत्र सुधारते अपचन, आम्लपित्त, छातीत जळजळ होणे, गॅस होणे यावर खूप गुणकारी आहे व आरोग्य चांगले राहण्यास मदत होते .

👉सांधे दुखी/ गुडघे दुखीमुळे जर सूज व वेदना होत असतील तर नियमित वापराने निश्चित तो त्रास कमी होऊन आराम पडतो .

👉कॅन्सर : नियमित हर्बल-टी चे सेवन केल्यास कॅन्सर सारख्या आजार पासून बचाव होण्यास मदत होते.

👉 वेट लॉस:जर नियमित हर्बल-टी पिल्या मुळे निश्चित पणे वजन नियंत्रित/कमी होण्यास फायदेमंद आहे .

👉हृदय रोग/ब्लड प्रेशर : हर्बल-टी नियमित सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रित होते व हृदय रोगी साठीही खूप उपयुक्त आहे .

🌼 हर्बल टी बनवताना लक्षात ढेवण्याच्या गोष्टी : Precautions while making Herbal Tea

👉 कोणत्याही हर्बल टी मध्ये कधीही दूध टाकू नये.

👉 गोड पणा हवाच असेल तर साखर न टाकता त्या जागी गूळ /मध किंवा खडीसाखर घालावे.

👉 हर्बल चहा वारंवार उकळू नये.

👉दिवसातून साधारण पाने १ ते २ वेळच घ्यावी.

👉 या चहाला झाकण ठेऊन उकळू नये, आयुर्वेदा नुसार असे केल्याने जास्त फायदा होतो.

👉 उन्हाळ्यात किंवा ज्यांची प्रकृती गरम आहे त्यांनी काळीमिरी / लवंग का वापर थोडा कमी करावा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या