Kokam Sharbat Recipe|Kokum Sharbat Benefits| Kokum fruit Juice recipe in marathi

कोकम सरबत: कोकमाचे औषधी गुणधर्म लक्षात घेता कोकम सरबत हे एक उत्तम आरोग्य पेय/हेल्थ ड्रिंक आहे. हे सरबत नुसतं चवदार नसून आपल्या शरीराला शीतलता देऊन मनाला ताजेतवाने करते.  आरोग्यदायी व पौष्टिक गुणांमुळे हे सरबत आपल्याला खूप लाभकारक आहे.     

कोकम किंवा रातांबा म्हणजे कोकणातला रानमेवा आहे. हे फळ दिसायला आलुबुखार सारखे असले तरी चवीत मात्र जमीन अस्मानाचा फरक आहे. काळपट जांभळट रंगाची रसरशीत फळ पाहिली की कोणाच्याही जिभेला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही.

खरतर चिंचे पेक्षाही कोकम हे अधिक औषधी गुणांनी युक्त असे गुणकारी फळ आहे, म्हणूनच तर जेवणात आंबटपणा आणण्यासाठी चिंचे ऐवजी कोकमाचा जास्त उपयोग करतात. कोकमाच्या फळाचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे. कोकमाच्या सालाची आमसूल बनवली जातात जी आपण जेवण अधिक रुचकर बनवण्यासाठी वापरतोय. कोकमाच्या बिया पासून औषधी तेल बनवलं जात.
    
कोकमाच्या फळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम,फॉस्फोरस,लोह,जीवनसत्व क आणि प्रथिने, तंतुमय पदार्थ असतात. कोकम लघु, रुक्ष, अम्ल, आम्लविकापी, पाचक, भूक प्रदीप्त करणारे आहे. वातशामक व कफ-पित्त-वात नाशक असल्यामुळे याचे सरबत हे खूप गुणकारी आहे.  उन्ह्याळ्याच्या रणरणत्या उन्ह्याच्या तापामुळे बऱ्याचदा अंगाची लाही-लाही तर होतेच पण त्याच बरोबर बेचैनी, डोकेदुखी व विशेष करून पित्त प्रकोप होतो.  अशावेळेला कोकम सरबत सारखं गुणकारी दुसर काही नाही. कोकम फळाला अमृत कोकम असे उगीचच म्हटले जाते नाही.  मग चला बनवूया अमृतमय कोकमाचे स्वादिष्ट व आरोग्यदायी सरबत.  

Kokum Sharbat Recipe
कोकम सरबत 

कोकम सरबत


कोकम सरबत साहित्य : Kokum Sharbat Ingredients


  • १ किलो कोकम फळे 
  • १ १/२ किलो साखर 
  • २ टी .स्पून मीठ 

कोकम सरबत बनवण्याची कृती :How to Make Kokum Sharbat Recipe

  • कोकमाचे सरबत करताना सर्वप्रथम काळसर लाल रंगाची मोठी फळे घ्यावीत. 
  • कोकमाची फळे पाण्याने धुवून स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावीत. 
  • कोकमाची फळांची देठ काढून घ्यावीत,नंतर फळाचे मधोमध दोन भाग करून मधला पांढरा गर (बिया ) काढून त्यावर मीठ लावून बाजूला ठेवा . 
  • नंतर स्टिलचे मोठे पातेले किंवा काचेची रुंद तोंडाची स्वच्छ आणि कोरडी बरणी घ्या. 
  • कोकमाच्या फळाचे बाहेरचे लाल आवरण (सालाचे) दोन भाग केलेले आहेत, त्यात मावेल एवढी साखर भरून बरणीच्या तळाशी साखर भरलेली साल एकावर-एक रचून ठेवा. 
  • अश्याप्रकारे सर्व साल पूर्ण साखर भरून ठेवा,उरलेली साखर मध्ये-मध्ये किंवा वरून घाला. 
  • मीठ लावून ठेवलेल्या बिया त्यांना पाणी सुटते,ते सर्व पाणी त्यावर घाला. 
  • बरणीच्या किंवा पातेल्याला सुती कपडयाने घट्ट बांधून कडक उन्हात ८-१० दिवस ठेवा. 
  • दररोज उन्हात ठेवताना बरणी नीट ढवळून मग उन्हात ठेवावी. 
  • ८-१० दिवसानंतर कोकमातील साखर विरघळून घट्ट पाक (सिरप) तयार होईल. 
  • साखर विरघळून सिरप तयार झाल्यावर साल घट्ट पिळून त्याचा सिरप वेगळे काढा आणि कोरडया स्वच्छ एअर टाइड काचेच्या बरणीत भरून ठेवा. 
  • कोकम सरबत करताना १ ग्लास पाण्यात १ टेबलस्पून कोकम सिरप आणि चिमूटभर काळ मीठ,१/४टी स्पून  भाजलेल्या जिऱ्याची पावडर,आवडीनुसार साखर मिसळून बर्फ घालून थंडगार सर्व्ह करा.  

टिप : Tips

  • कोकम फळे धुतल्यानंतर पुसून कोरडी करावी पाण्याचा अंश राहू देऊ नये. 
  • कोकम सरबत १-२ वर्ष आरामात टिकते. 

🌼 कोकम सरबत आरोग्यास होणारे लाभ : Kokum Sharbat Health Benefits


👉पोटाच्या तक्रारी : कोकम सरबत बद्धकोष्ठता व पाचन सबंधीच्या सर्व तक्रारींवर अत्यंत गुणकारी आहे.

👉 भरपूर प्रमाणात असणारी पोषक तत्व : कोकमामध्ये भरपूर प्रमाणात आवश्यक पोषकद्रव्य व व्हिटॅमिन असतात. यात व्हिटॅमिन बी,अस्कॉर्बिक ऍसिड,मॅगनीज,पोटॅशिअम, डायटरी फायबर व गार्सिनॉल चे हेल्दी मिश्रण असते.  त्यामुळे कोकम सरबत अत्यंत उपयुक्त हेल्दी पेय आहे .

👉 अँटी फंगल/अँटी ऑक्सिडेंट : कोकमा मध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सिडेंट व अँटी फंगल गुणामुळे आपले इन्फेकशन पासून बचाव होतो.

👉 अँटी एजिंग : कोकमात  असलेल्या अँटी ऑक्सिडेन्ट मुळे त्वचा व केसाचे आरोग्य व ग्लो सुधारण्यास मदत होते. अँटी एजिंग गुणांमुळे पेशींची दुरुस्ती व पुनर्निर्माण होण्यास मदत होते.

👉कॉलेस्ट्राँल  :कोकमात कॅलरी कमी असतात,कॉलेस्ट्रॉलची पातळी नियमित करण्यास मदत करते व अँटी इन्फ्लमेटरी गुनामुळे हे हृदयाचे संरक्षण करते त्यामुळे कोकम सरबत ह्रदयरोग्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

👉पित्त व ऍसिडिटी : कोकम पित्तशामक असल्यामुळे कोकम सरबत नियमीत सेवन केल्यामुळे पित्त तसेच ऍसिडिटीवर गुणकारी आहे.   

👉अँटी कॅन्सर : कोकम सरबत कॅन्सर पासून स्वरंक्षण करते कारण यात असणाऱ्या गार्सिनॉल मुळे कॅन्सर सेलच्या अनियमित वाढीला अटकाव करते.

👉यकृताला संरक्षण देते : कोकम सरबत शरीराची अतिरिक्त उष्णता/गर्मी कमी करते. अपायकारक केमिकल मुळे यकृतावर होणाऱ्या परिणामांना कमी करते व यकृताचे संरक्षण करते.


🌼 काही अन्य पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या