awla sharbat recipe| amla juice recipe|amla sharbat benefits in marathi

आवळ्याचे सरबत- (Awla Sharbat Recipe): आवळ्याचे पाचक सरबत म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार हेल्थ ड्रिंक आहे. आयुर्वेदात आवळ्याचे असंख्य उपयोग सांगितलेले आहेत.

उदा. शक्तिवर्धक, केशवर्धक, पित्तशामक, रक्तशोधक, वीर्यवर्धक, डायबेटिस, कॅन्सर, नितळनिरोगी त्वचेसाठी अश्या  अनेक रोगांवर/समस्यावर उपयुक्त आवळा एक उत्तम औषधीय फळ आहे.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-ए, बी कॉम्पलेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, आयरन, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट, फायबर असे अनेक पोषक गुणांनी समृद्ध असल्यामुळे आवळ्याला आयुर्वेदात उत्तम रसायन म्हणून आयुर्वेदामध्ये संबोधण्यात आले आहे. 

आवळा हा अँटिपायरेटिक, विषाणू रोधक, अँटीअनेमिया, हृदय व रक्तवाहिन्या संरक्षक,गॅस्ट्रो प्रोटेक्टिव्ह,    अँटिऑक्सिडेन्ट, अँटी एजिंग (म्हणजेच वृद्धत्वाला रोखणारा) असे असंख्य गुणधर्म असल्यामुळे आवळ्याला आयुर्वेदात अनन्य साधारण महत्व आहे. आवळा हे निसर्गाचे आपल्यासाठी वरदानच आहे. 

आवळ्यामध्ये लिंबापेक्ष्या १० पट जास्त व्हिटॅमिन सी असते. आवळा तुरट, आंबट आणि गोड अश्या विविध रसांनी परिपूर्ण असतो, शीतल आणि पचायला हलका असतो. आवळा हा कोणत्याही स्वरूपात खाल्ला तरी तो अत्यंत हितकारक आहे. आवळा जरी शिजवला तरी त्याच्यातील "व्हिटॅमिन-सी" कमी होत नाही. आवळा हा उत्तम रसायन म्हणजे रसरक्तादी धातूंना संपन्न करणारा असतो. तसेच तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी श्रेष्ठ मानला जातो. आवळा शरीरातील अनेक व्याधींमध्ये फायदेशीर आहे, असंख्य गुणांनी परिपूर्ण असल्यामुळे आवळ्याला अमृताची उपमा दिली जाते.  मग चला अश्या या बहुगुणी आवळ्याचे पौष्टिक व पाचक सरबत बनवूया.  
                                     



Awla Sharbat Recipe
आवळा सरबत 


आवळ्याचे सरबत

सरबत बनवण्याची प्रथम पद्धत :



आवळा सरबतासाठी साहित्य : Ingredient Of Amla Sharbat 


  • १ किलो मोठे आवळे 
  • १ इंच आल्याचा तुकडा 
  • १ किलो साखर  
  • ७ ग्रॅम सायट्रिक ऍसिड
  • १ ग्राम पोटॅशियम मेटाबायसल्फाइट
  • १ टी .स्पून मीठ  
  • १ टी . स्पून वेलची पावडर/काळी मिरी पावडर 
  • २ टी.स्पून काळ मीठ (चवी प्रमाणे)    

आवळा सरबत बनवण्याची कृती :



स्टेप १ : 

  • प्रथम चांगले रसरशीत मोठे आवळे निवडून घ्यावे. 
  • आवळे चांगले धुऊन कुकर मध्ये वाफवून घ्या, थंड झाल्यावर त्याच्या बिया काढून घ्यावेत. 
  • नंतर आवळ्याच्या फोडी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या.  
  • एका सुती कपडयांतून गर गाळून रस वेगळा काढावा.
  • आल्याची साल काढून किसून रस काढून घ्यावा.

स्टेप २ : 

  • नंतर अर्धा लिटर पाण्यात साखर घालून गॅसवर शिजत ठेवावे. 
  • शिजवण्यासाठी जाड बुडाच्या नॉनस्टिक पॅन वापरावा. 
  • साखरेचा पाकाला एक उकळी आली की त्यात पोटॅशियम मेटाबायसल्फाइट,सायट्रिक असिड,आल्याचा रस,काळीमिरी पावडर,मीठ,काळ मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
  • एक उकळी आली व सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर गॅस बंद करा.  
  • मिश्रण गाळून त्यात आवळ्याचा रस मिक्स करून घ्यावा.  
  • नंतर निर्जंतुक केलेल्या कोरड्या बाटलीत भरून फ्रिज मध्ये भरून ठेवावे. 
  • जेव्हा सरबत बनवायचे असेल तेव्हा गरजेप्रमाणे थंड पाण्यात मिक्स करून सरबत करावे. 

🌼 🌼 आवळा सरबत बनवण्याची दुसरी पध्दत 🌼 🌼


आवळा सरबतासाठी साहित्य : Ingredient Of Amla Sharbat 

  • १/२ किलो मोठे आवळे 
  • १/२ इंच आल्याचा तुकडा 
  • रसाच्या दुप्पट साखर 
  • २ ते ३ लिंबे 
  • १ चमचा जीरा पावडर
  • काळ मीठ (चवी प्रमाणे)    

आवळा सरबत बनवण्याची कृती :

स्टेप १ :

  • प्रथम आवळे घेऊन स्वच्छ धुऊन, बिया काढून घ्याव्यात.
  • आल्याची साल काढून किसून घ्या, त्याचा रस काढून घ्यावा.  
  • मिक्सर जार मधून आवळे तुकडे टाकून बारीक पेस्ट करून घ्या. 
  • आवळ्याचा रस काढून सुती कपडयांतून गाळून घ्या.

स्टेप २ : 

  • नंतर आवळ्याचा रस व आल्याचा रस एकत्र करून घ्यावा. 
  • या रसाच्या दुप्पट साखर घेऊन त्यात अर्धा लिटर पाणी घालून पाक करून घ्या, मिश्रण सतत चमच्यानी साखर विरघळे पर्यत हलवत रहा. 
  • पाक साधारण चिकट झाल्यावर गॅस बंद करून घ्या.  
  • पाक थंड झाल्यावर त्यात वरील एकत्र केलेला रस(आवळ्याचा रस व आल्याचा रस) घालून त्यात जीर पावडर,काळ मीठ घालावे. 
  • त्यात तीन-चार लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्या. 
  • ज्या प्रमाणात आंबट पणा हवा असले तेवढया लिंबाचा रस आपण घालू शकतो. 
  • आता हा तयार झालेला सरबत स्टरलाइझ बाटलीत भरून फ्रिज मध्ये ठेवावे. 
  • जेव्हा शरबत बनवायचे असेल तेव्हा गरजेप्रमाणे पाण्यात मिक्स करून सरबत करावे. 
  • आपले स्वादिष्ट आणि स्वास्थवर्धक आवळ्याचे सरबत तयार आहे. 

टीप : Tips 

  1. सरबतात आवश्यक वाटल्यास थोडा खाण्याचा रंग/केशर ही टाकू शकतो.
  2. हे सरबत वर्षभर फ्रिज मध्ये ठेवून स्टोर करू शकतो.  
  3. मिश्रण थंड झाल्यावर लिंबाचा रस मिक्स करा. लिंबाचा रस गरम मिश्रणात मिक्स केल्याने शरबत कडू होते . 
  4. शरबता मध्ये जिरं पावडरच्या जागी काळीमीरी पावडर ही घालू शकतो. 

🌼 आवळ्याच्या सरबताचे आरोग्यास मिळणारे लाभ: Amla Sharbat Health Benefits  


👉 डोळ्यांच्या आरोग्यासाठी: आवळ्यामध्ये असणारे अँटी ऑक्सिडेन्ट डोळ्यांच्या रेटिनासाठी खूप फायदेमंद आहे.  डोळ्याच्या उत्तम आरोग्यासाठी आवळा खूप उपयुक्त आहे.

👉 अँटी कॅन्सर : एका शोधाच्या अनुसार आवळा कॅन्सर पेशींच्या वाढ होण्यास अटकाव करतो. कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी आवळा खूप उपयुक्त आहे. 

👉 पित्त शामक आहे : आवळा सरबत शरीरातील उष्णता कमी करतो व ऍसिडिटी/पित्ताचे शमन करतो. 

👉अल्सर वर उपयुक्त: आवळा पेप्टिक अल्सर मध्ये खूप लाभकारक ठरला आहे. आवळा सेवनाने अल्सर मधून अल्सर मध्ये खूप आराम पडतो.

👉 रोगप्रतिकारक शक्ती :आवळ्यामध्ये असणारे अँटी बॅक्टरीयल, अँटी इन्फेमेटरी तसेच या प्रकारच्या अन्य गुणामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. व्हिटॅमिन सी मुळे रोगांशी लढण्यास मदत होते. 

👉 वजन कमी करण्यासाठी: आवळा जूस पिल्याने शरीरातील असलेली घाण साफ होते व वजन कमी होण्यास मदत होते. मेटाबॉलिज्म मजबूत करतो. नियमित आवळ्याचा जूस पिल्याने शरीरात घाण जमली जात नाही .

👉केस व त्वचेसाठी उपयुक्त: आवळ्यामधून व्हिटॅमिन सी, आयरन,व्हिटॅमिन-बी,प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतात. केसाच्या उत्तम वाढी साठी तसेच अकाली सफेद होण्यापासून बचावासाठी  व नितळ निरोगी त्वचेसाठी आवळा जूस खूप उपयोगी आहे. 

👉अँटी एजिंग:आवळा उत्तम रसायन आहे.आवळा तारुण्य टिकवून ठेवणाऱ्या रसायनं मध्ये श्रेष्ठ समजला जातो.


🌼 काही अन्य रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👉 स्वादिष्ट व पौष्टिक आवळा मुरंबा रेसिपी पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

👉 आयुर्वेदिक होममेड हर्बल टी रेसिपी पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या