olya haldiche lonche | fresh turmeric root pickle| kacchya haldiche lonche benefits

ओल्या हळदीचे लोणचे : आयुर्वेदा नुसार हळद एक उत्तम औषधीय गुणधर्म असणारी वनस्पती आहे. हळदीचे लोणच(fresh turmeric root pickle) आहारात असल्यामुळे आपल्या तोंडाला चव तर येतेच त्याबरोबर आपली पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते. 

हळदीच्या नियमित सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढून आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्याच बरोबर जेवताना हळदीचं लोणचं असल्यास आपण खाल्लेले अन्न चांगल्या प्रकारे पचन होण्यास मदत होते.

चला तर मग बनवूया आपल्या जिभेची चव वाढवणाऱ्या व आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या ओल्या / कच्च्या हळदीचे लोणचे.

olya-haldiche-lonche-recipe


ओल्या हळदीचे लोणचे 



लोणच्याची आवश्यक सामग्री: Ingredients fresh turmeric pickle


  • २५० ग्राम ओली हळद 
  • ३-४ लिंबू 
  • १/४ छोटा चमचा हिंग 
  • २ छोटे चमचे मेथी 
  • ३ छोटा चमचा मोहरी
  • १ चमचा जिरे  
  • १ छोटा चमचा सुंठ पावडर 
  • १ छोटा चमचा कलौंजी 
  • २ चमचा बडीशेप पावडर 
  • १ चमचा अख्खी बडीशेप 
  • १ लाल मिर्च पावडर 
  • २ चमचे मीठ 
  • १०० ग्राम मोहरीचे तेल 

हळदीचे लोणचे बनवण्याची कृती : 

स्टेप १ : 
  1. ओली हळद स्वच्छ धुऊन कपड्याने पुसून त्याची साल काढून लांबट उभे काप करून घ्यावेत किंवा किसून घ्यावेत. 
  2. नंतर कपड्यावर/कागदावर हळदीचे कापलेले तुकडे पसरवून २-३ तास उन्हात वाळवुन घ्या किंवा घरातच कपड्यावर पसरवून वाळवून घ्या.  
  3. पॅन मध्ये मोहरी,मेथी,२ चमचे बडीशेप,१ चमचा जिरे कोरडेच २ मिनिट (वेग वेगळे) परतून घ्या. 
  4. नंतर मोहरी,मेथी आणि बडीशेप,जिरे थंड झाल्यावर जाडसर पावडर करून घ्या. 
  5. कलौंजी (कांद्याचे बी) पण २ मिनिट कोरडीच परतून घ्या.  
स्टेप २ : 
  1. एका पॅन मध्ये मोहरीचे तेल चांगले गरम करून घ्या. 
  2. तेल धूर येईपर्यंत चांगले तापल्यानंतर गॅस बंद करून हलके तेल थंड करून घ्या. 
  3. नंतर तेलात वरील जाडसर केलेल्या सर्व पावडर(मोहरी-बडीशेप-मेथी -जिरे यांच्या पावडर), हिंग, सुंठ पावडर,लाल मिर्च पावडर, कलौंजी, १ चमचा अख्खी बडीशेप, टाकुन सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यावेत.  
  4. नंतर हळदीचे कापलेले तुकडे, मीठ आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करून घ्या. 
  5. तयार मिश्रण स्वच्छ कोरड्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या (हवा बंद) भांड्यात भरून ठेवा. 
  6. लोणच्यावरती तेल कमी पडले तर तेल तापवून थंड करून घाला. 
  7. जास्त दिवस लोणचं टिकण्यासाठी ३-४ दिवस उन्हांत ठेवा. 
  8. लोणच्यावरती तेल राहिलेतर लोणचं बरेच महीने आरामात टिकते. 

टीप : tips 

  • लोणच भरताना काचेची बरणी कोरडी उन्हात सुकवून कोरडी करून घ्या . 
  • लोणचे काढताना नेहमी कोरड्या चमच्याचा वापर करावे . 
  • उन्हांत बरणी ठेवताना मलमलच्या कपड्याने घट्ट बांधुन ठेवा . 
  • लोणचं पूर्णपणे तेलांत बुडालेले असेल तर खराब होत नाही. 
  • सुंठ पावडरच्या जागी आलं वापरलं तरी चालते. 
  • लिंबा ऐवजी आमचुर किंवा आवळा पावडर ही वापरली जाते . 
  • ओली हळद आणि आंबे हळद दोन्ही एकत्र करूनही लोणचं केले जाते.    

🌼 ओली हळदीचे  फायदे : Fresh Turmeric Benefits 


👉हळदी मध्ये एंटीबैक्टीरियल,एंटीसेप्टिक,एंटीइंफ्लेमेटरी,एंटीवायरल,एंटीऑक्सीडेंट,एंटीफंगल,अँटीम्युटा जेनिक,एंटी-माइक्रोबियल अश्या विविध गुणधर्मानी हळद ही परिपूर्ण आहे.

👉रोगप्रतिरोधक:हळदीचे नियमित सेवन केल्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते.  तसेच हळदीमध्ये असलेल्या अँटिव्हायरल गुणधर्मामुळे सर्दी आणि तापा सारख्या सामान्य व्हायरल समस्या पासून बचाव होतो . 

👉 मधुमेहामध्ये : हळद मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहे, इन्सुलिन योग्य प्रमाणात निर्मिती होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते.   


👉गुडघेदुखी : हळद एंटीइंफ्लेमेटरी असल्यामुळे आर्थरायटीस आणि सांधेदुखी या प्रकारच्या दुखण्यावर अंत्यत गुणकारी आहे. हळदीच्या नियमित सेवनाने सांध्यावरील सूज कमी होऊन गुडघेदुखी पासून आराम मिळतो. 


👉हृदयाच्या आरोग्यासाठी: हळदी मध्ये असलेल्या करक्युमिन आणि व्हिटॅमिन ६ एंटीइंफ्लेमेटरीमुळे कॉलेस्ट्रॉल नियंत्रित होऊन हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 


👉यकृत: हळदीमुळे यकृताचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. हळदीमध्ये एंटीबैक्टीरियल गुण असल्यामुळे   कोणत्याही प्रकारच्या इनफेक्शन पासुन संरक्षण होऊन यकृत निरोगी राहण्यास मदत होते.  


👉 कॅन्सरपासून बचाव: हळदी मध्ये करक्युमिनोइड्स आणि वोलाटाइड तेल असल्यामुळे कॅन्सर सारख्या आजारापासुन आपला बचाव होण्यास मदत होते. 

👉जखम भरण्यास: हळदीमध्ये एंटीबैक्टीरियल आणि एंटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरावरील कोणत्याही प्रकारची जखम लवकर बरी होण्यास मदत होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या