masala shengdana recipe |chatpata mungfali snack recipe| Masala peanut recipe in marathi

मसाला शेंगदाणे: शेंगदाणे आपल्या सर्वाचा आवडीचा पदार्थ आहे मग ते भाजके असो व मसालेदार, तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही. असा एकही व्यक्ती शोधुन सापडणार नाही ज्याला शेंगदाणे आवडत नाहीत. मसालेदार,चटपटीत शेंगदाणे कधीही कुठेही खाऊ शकतो. मग चहाबरोबर खा किंवा नुसता टाईम पास म्हणून खा. ज्यांना मसालेदार पदार्थ खायला आवडतात त्यांच्या साठी कुरकुरीत मसालेदार शेंगदाणे खाणे हा एक चांगला पर्याय होऊ शकतो.

लहानांपासून ते मोठयांपर्यंत सर्वाना आवडणारे लज्जतदार चटपटीत शेंगदाणे कमी वेळात आणि अगदी सहजतेने बनविता येणारा पदार्थ आहे. कधीही आपण घरात असणाऱ्या कमीतकमी सामग्री पासुन अगदी सहजतेने बनवू शकतो. मग चला बनवूया चटपटीत मसालेदार शेंगदाणे.

मसालेदार शेंगदाणे 

 चटपटीत मसाला शेंगदाणे 


मसाला शेंगदाण्यासाठी साहित्य : Ingredient for Masala Peanut 


  • १ कप शेंगदाणे 
  • १/४ कप बेसन 
  • १ चमचा तांदळाचे पीठ 
  • १ चमचा कॉर्नफ्लॉवर 
  • १ /२ चम्मच लालमिरची पावडर 
  • चिमूटभर हळद 
  • चिमूटभर हिंग 
  • १ चिमूटभर बेकिंग सोडा 
  • १/४ छोटा चाट मसाला/आमचूर पावडर 
  • १/४ छोटा चमचा गरम मसाला 
  • १ /२ चम्मच धणे पावडर
  • १ चमचा तेल   
  • मीठ स्वादानुसार 
  • तेल तळण्यासाठी 

मसाला शेंगदाणे बनविण्याची कृती :

स्टेप १:

  • सर्वप्रथम शेंगदाणे साफ करून घ्या. नंतर अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. 
  • एका बाऊल मध्ये बेसन आणि १ चमचे तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर चाळून घ्या. 
  • नंतर त्यात लाल-मिरची पावडर,हळद,धणे पावडर,गरम मसाला,बेकिंग सोडा व स्वादानुसार मीठ घालून चांगले मिक्स करा.
  • भिजलेल्या शेंगदाण्यातून पाणी काढून निथळून घ्यावे. 
  • नंतर पाणी काढलेले शेंगदाणे बाऊल मधील मिश्रणात घालून चांगले मिक्स करून घ्यावे. 
  • एक चमचा तेल घालून आवश्यकते नुसार थोड-थोड पाणी घालून शेंगदाण्याला मिश्रण चागंल्या प्रकारे लागले पाहिजे अश्या प्रकारे मिक्स करून घ्या. 
  • तेलाचा वापर केल्यामुळे शेंगदाण्याला मसाला व्यवस्थित कोट होण्यास मदत होते.  
  • नंतर गरज भासल्यास परत थोडास पाणी टाकून मसाला शेंगदाण्याला चांगल्या प्रकारे लागेपर्यंत मिक्स करून घ्या.    
  • नंतर मिश्रणात एक चमचा तांदळाचे पीठ टाका,यामुळे शेंगदाणे सुटसुटीत होण्यास मदत होते. 

स्टेप २:

  • शेंगदाणे तळण्यासाठी मध्यम आचेवर कढईत तेल तापत ठेवा. 
  • तेल तापल्यानंतर थोडे-थोडे दाणे एक-एक सुटसुटीत करून गरम तेलात तळण्यासाठी सोडा. 
  • एका वेळेला कढईत जेवढे शेंगदाणे सहजपणे तळले जाऊ शकतील तेवढेच शेंगदाणे तेलात सोडा. 
  • मंद गॅस वर दोन्ही बाजुनी कोटींग कुरकुरीत आणि गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्या. 
  • शेंगदाणे तळण्यासाठी जवळ-जवळ ४-५मिनिट लागतात. 
  • अश्याच प्रकारे बाकीचे उरलेले शेंगदाणे थोडे थोडे करून टाकून तळून घ्यावे. 
  • कुरकुरीत तळून झाल्यावर टिशू पेपर वर काढून त्यावर गरम असतानाच चाट मसाला भुरभुरून घ्या, म्हणजे चाट मसाला चांगल्या प्रकारे शेंगदाण्याला लागेल. 
  • चटपटीत मसालेदार शेंगदाणे खाण्यासाठी तयार आहेत. 
  • थंड झाल्यावर एअर टाइड डब्यात भरून ठेवा. २ महिने आरामात मसाला शेंगदाणे राहतात. 

टिप :Tips 

  1. मसाला शेंगदाण्यात आपल्याला आवडत असल्यास आल-लसूण पेस्ट ही टाकू शकतो. 
  2. मिरची पावडरच्या काळीमिरी पावडर ही स्वादासाठी टाकू शकतो.
  3. शेंगदाणे जास्त चटपटीत आवडत असल्यास लिंबू रसाचा ही वापर करू शकतो.  
  4. यात आपल्याला आवडत असलेया सेंधव मीठ, सुंठ पावडर सुद्धा वापरू शकता.  
  5. मसाला शेंगदाणे मध्यम ते मंद गॅसवर तळा.फास्ट गॅसवर शेंगदाणे तळल्यास कुरकुरीत नाही बनणार . 

🌼अन्य स्नॅक रेसिपीस पाहण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा . 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या