limbache lonche | nimbu ka achar| limbache achar | indian lime pickle | lemon pickle recipe

लिंबाचे लोणचे 


लिबांचे लोणचे (limbache lonche) सगळ्यांनाच आवडते आणि लिंबात व्हिटॅमिन सी भरपूर असल्यामुळे या लोणच्याचे (lime pickle) आहारात महत्वाचे स्थान आहे. आजारपणा नंतर तोंडाची चव जाते तेव्हा लिंबाचे लोणचे चाखले तर त्याचा फायदा होतो. आपण जेवताना जोडीला लिंबाचे लोणचे घेतले कि जेवणाची गोडी वाढते अन्न अधिक रुचकर लागते.


limbache lonche recipe


लिंबाच्या लोणच्याचे काही आरोग्यकारक फायदे : Benefits of lemon pickles in marathi

  • अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते त्यामुळे पोटाच्या तक्रारी निश्चितपणे कमी होण्यास मदत होते . 
  • लिंबात व्हिटॅमिन सी मोठया प्रमाणात असते त्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेत सुधारणा होते. 
  • काही शोधा प्रमाणे लिंबाचे लोणचे आठवड्यातून एकदा खाल्यावर मधुमेही रुग्णांना फायदा होतो. 
  • लिंबामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते तसेच लोणच्यांमध्ये घातलेल्या मसाल्यामुळे चरबी घटते. 
  • अँटिऑक्सिडेन्ट मुबलक प्रमाणात असतात. अँटिऑक्सिडेन्ट हे कॅन्सर,रक्तदाब,हृदयरोगाच्या धोक्याला कमी करून वाढत्या वयाच्या प्रभावाला थांबवते. 
  • लिंबाच्या साला मध्ये बैक्टरीयल आणि फंगल इंफेक्शन दूर करण्याची क्षमता असते. 
  • यामध्ये शून्य कोलेस्ट्रॉलचे प्रमाण असते (शून्य कोलेस्ट्रॉल असल्याने हृदयरोगाची कमी जोखीम असते)
  • अल्सर व मांसपेशी मध्ये होणारे क्रम्प्स पासून बचाव होतो 
  • व्हिटॅमिन ए,सी,बी कॉम्प्लेक्स व फायबरचा उत्तम स्रोत आहे. 
  • लिंबामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे असतात जसे लोह, तांबे, पोटॅशियम,कॅल्शियम इत्यादी. जे आपल्या रक्तदाब व हृदयाची स्पंदने कंट्रोल करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात.
  • योग्य प्रमाणात लिंबू लोणच्याचे सेवन केल्यास आरोग्यकारक ठरते.   



लिंबाच्या लोणच्या साठी आवश्यक साहित्य: Ingredients for lemon pickle 

  • १२ लिंबू 
  • १ चमचा हळद 
  • २ चमचे लाल मिरची पावडर 
  • ३ चमचे मोहरी डाळ 
  • १ चमचा मेथीचे दाणे 
  • १/२ चमचा हिंग 
  • ३ चमचे मीठ 
  • १/२ चमचा काळं मीठ 
  • १ कप तेल 

लिंबाचा लोणचे बनविण्याची कृती: How to make lemon pickle 

स्टेप १ :   
  • सर्वप्रथम मोठी रसरशीत आणि कडक बिना डागाची लिंबे घेऊन स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यावीत. 
  • नंतर आपल्या आवडीनुसार ४ किंवा ८ फोडी करून घ्याव्यात.
  • कापलेल्या लिंबाच्या फोडी मधून बिया काढून टाका कारण लिंबाच्या बियांमुळे लोणचे कडू लागते. 
  • लिंबाच्या फोडी एका ताटलीत ठेवून नंतर ही ताटली चाळणीवर ठेवा.
  • एका पातेल्यात किंवा स्टिमर मध्ये पाणी गरम करायला ठेवा.
  • पातेल्यातील पानी गरम झाल्यावर त्यावर लिंबाची फोडीची ताटली चाळण ठेऊन १० मिनिट मध्यम आचेवर ठेवून वाफवून घ्यावेत. 
  • १० मिनिटा नंतर गॅस बंद करून फोडी थंड करून घ्या.
स्टेप २:
  •  पॅन मध्ये मंद आचेवर १/२ मिनिट हल्की मोहरीची डाळ रंग न बदलता परतून घ्या.
  • मोहरी डाळ परतल्यावर एका प्लेट मध्ये काढून थंड करून घ्या. 
  • मेथीचे दाणे पण हल्के मंद आचेवर परतून घ्या.
  • मेथी हल्की लालसर झाली की थंड करून जाडसर कुटून किंवा वाटून भरड करून घ्या. 
  • एका कढईत तेल चांगले गरम करून घ्या. नंतर तेल गरम झाल्यावर कोमट करून घ्या. 
  • नंतर लाल मिरची पावडर,हल्दी, जाडसर वाटलेली मेथीचे दाणे,हिंग आणि मोहरी डाळ आणि मीठ सर्व मसाले चांगले मिक्स करून थंड केलेल्या लिंबाच्या फोडीना चोळून एकजीव करून घ्या.
  • एका निर्जंतुक केलेल्या कोरड्या काचेच्या बरणीत मसाला लावलेल्या लिंबाच्या फोडी भरून त्यावर थंड करून ठेवलेले तेल ओतून सर्व मिश्रण एकजीव करून २-३ दिवस मुरवत ठेवा. 
टीप : Tips for making lemon pickle 
  1. मोहरीची डाळ नसेल तर अख्खी मोहरी परतून भरड करून ही वापरू शकतो. 
  2. लिंबाच्या लोणच्या वरती तेल राहिले पाहिजे म्हणजे ते बरेच दिवस टिकेल. 
  3. लोणचे बरणीतून काढताना कोरडा चमचा वापरावा.
  4. लिंबाच्या लोणच्यात आवडत असेल तर १ चमचा जीरे,बडिशेप भाजून पाउडर करून वापरू शकतो.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या