Homemade digestive Masala Mukhwas | Ayurvedic badishep Mukhwas powder | multi seeds mukhwas

होममेड डायजेस्टिव्ह मसाला मुखवास 

आपल्या आयुर्वेदात सांगितलेल्या पचनासाठी लाभकारक सामग्री वापरून बनवलेला हा मुखवास तुम्ही घरच्या घरी सहज बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. यामध्ये वापरलेली प्रत्येक वस्तू ही आपल्या पचना  साठी तर उपयुक्त आहेच त्याच बरोबर यामध्ये असणारे गुणकारी औषधीय गुणधर्म आपल्या शरीराच्या बऱ्याच छोट्या मोठ्या तक्रारी वर खूप गुणकारी आहेत. त्यामुळे नियमितपणे आहारानंतर मुखवास खाल्याने अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते. 




Homemade digestive Masala Mukhwas




मुखवासा साठीचे आवश्यक साहित्य : Ingredients for Ayurvedic Mukhwas Recipe

  • १ कप बडीशेप  - (Fennel seeds )
  • १/२ कप धण्याची डाळ  - (Coriander Seeds)
  • २ चमचे तीळ  - (White Sesame ) 
  • २ चमचे बाळंतशोपा  - (Dill Seeds )
  • २ चमचे ओवा   - (Carom Seeds )
  • ५ चमचे जेष्ठमध पावडर  - (Licorice/Liquorice)
  • १/२ चमचा सुंठ पावडर  - (Dry Ginger)
  • ४-५ लवंग/(१/२ teaspoon powder)  - (Cloves )
  • १  दालचिनी तुकडा/(१ teaspoon powder) - (Cinnamon )
  • २ चमचे आळशी  - (Flax Seeds )
  • चवीनुसार सेंधव मीठ   - (Rock Salt)
  • चवीनुसार काळ मीठ   - (Black salt )
  • ८-१० वेलदोडे  - (Cardamom )

मुखवास बनवण्याची कृती  : How to make Mukhwas 


स्टेप १ : 
  • मुखवास बनविण्यासाठी सर्व प्रथम एका जाड बुडाच्या कढईत बडीशेप भाजून घ्यावी. 
  • बडीशेप भाजून झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून ठेवा. 
  • नंतर बाळंतशोपा हलका कुरकुरीत होईपर्यंत भाजून प्लेट मध्ये काढून घ्यावा. 
  • नंतर कढईत धण्याची डाळ हलकी भाजून घ्यावी. धण्याची डाळ भाजून झाल्यावर ओवा कुरकुरीत होईपर्यत भाजून प्लेट मध्ये काढून ठेवा. 
  • आळशी पण थोडी गरम करून भाजून घ्या. आळशी भाजून झाल्यावर काढून एका प्लेट मध्ये ठेवा. 
  • तीळ ही अश्याच प्रकारे हलके भाजून घ्यावे. तीळ भाजून झाल्यावर वेलदोडे थोडे सालासकट गरम करून घ्या. 
  • वेलदोडे भाजल्यानंतर लवंग आणि दालचिनी थोडी परतून घ्यावी. 
  • भाजलेले सर्व साहित्य थंड होऊ द्यावे.
स्टेप २ :

  • थंड झालेले सर्व साहित्य एक-एक करून वेगवेगळे थोडे (जाडसर) भरड करून घ्यावी, हे मिश्रण जास्त बारीक करू नये. 
  • वाटलेले सर्व मिश्रण एका मोठ्या भांडयात काढून घ्यावे. 
  • नंतर त्यात चवीनुसार सैंधव मीठ,काळ मीठ,जेष्ठमध पावडर, सुंठ पावडर  टाकून सर्व एकत्र व्यवस्थित मिसळून घ्यावे. 
  • तयार मुखवास मसाला हवाबंद डब्यात भरून ठेवा. 


टिप :Tips for mukhwas

  • होममेड डायजेस्टिव्ह मसाला मुखवास मध्ये आवडत असल्यास भरडी सुपारी ही घालू शकतो. 


🌼  मुखवास खाण्याचे फायदे : Health Benefits of Mukhwas


👉 बडीशेप खाल्याने पाचनक्रियाचे कार्य सुरळीत राहते, गॅस व अपचनाच्या तक्रारी पासून आराम मिळतो.

👉 बाळंतशेपा नियमित खाल्याने पाचनक्रिया चांगली राहते तसेच बद्धकोष्टतेच्या तक्रारी मध्ये आराम पडतो .

👉आळशी मध्ये अँटिऑक्सिडंट आणि ओमेगा-३ भरपूर प्रमाणत असतात.त्याच्यात हृदयाच्या आरोग्यासाठी,कॉलेस्ट्राल नियंत्रित राहण्यासाठी तसेच अस्थमा,कॅन्सर आणि आर्थ्रायटिस,मधुमेह सारख्या आजारांमध्ये लढण्यास मदत होते. 

👉तीळ मध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, आयरन,झिंक, सेलेनियम, मॅग्नेशियम असल्यामुळे केसांच्या, त्वचेच्या, हाडांच्या आणि हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी तीळ खाणे लाभदायक असते . 

👉जेष्ठमध मध्ये कॅल्शियम,अँटिऑक्सिडंट,अँटी बायोटिक,प्रथिने,ग्लीसारायजक ऍसिड असे विविध गुणधर्म असल्यामुळे सर्दी,खोकला,शारीरिक कमजोरी आणि त्रिदोष म्हणजे वात,पित्त आणि कफ अत्यंत लाभदायक आहेत. 

👉ओवा पोट संबंधीत समस्यांवर अत्यंत रामबाण ठरतो, पोटदुखी, गॅसेस, अपचन, ऍसिडिटी, आंबट ढेकर येणे यावर ओवा अत्यंत गुणकारी आहे .  

👉सुंठ मध्ये फायबर विपुल प्रमाणात असते, बद्धकोष्ठता , अपचन, मधुमेह , हृदयरोग यामध्ये सुंठ पावडर सेवनाने भरपूर लाभ होतो .  

👉लवंग मध्ये अँटी ऑक्सिडेन्ट, अँटी वायरल , जिवाणू विरोधी, अँटी सेप्टिक , अँटी इंफ्लामेंटरी गुणधर्म विपुल प्रमाणात असल्यामुळे  पचन स्वस्था , श्वसन , डोकेदुखी , तोंडातून दुर्गंध येणे अश्या कित्तेक समस्यांवर लवंग खूप उपयुक्त असते. 

👉 दालचिनीच्या सेवनाने मधुमेह नियंत्रित होतो, हृदयाच्या स्वास्थासाठी, कॅन्सर सारख्या आजारापासून बचाव होतो तसेच मेंदूची कार्यक्षमता वाढते. 

👉 सैंधव मीठ पचन तंत्र सुधारण्यास मदत करते , तसेच याची प्रकृती थंड असल्यामुळे पित्त दोष संतुलन करण्यास ही खूप उपयुक्त आहे . 



🌼 अन्य पॉप्युलर रेसिपीस पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👉 होममेड हर्बल चहाची रेसिपी व त्याचे फायदे पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा .


👉 आवळ्याचे सरबत रेसिपी व त्याचे फायदे पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या