स्टफ आलू पुरी :
चहा बरोबर किंवा स्नॅक म्हणून खाण्यासाठी स्टफ आलू पूरी एक स्वादिष्ठ पदार्थ आहे. पुरी ही सगळयांचा आवडता पदार्थ आहे आणि त्यात मसालेदार बटाटयाचे सारण म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच. कधीही जेव्हा काही चटपटीत खावेसे वाटले की आलू पुरी एक उत्तम पर्याय आहे.
स्टफ आलू पूरीच्या सारणासाठीचे साहित्य: Ingredients for stuffed aloo puri
- २ मध्यम बटाटा
- १-२ हिरवी मिरची
- १ छोटा चमचे बडीशेप
- चिमूटभर हिंग
- १ छोटा चमचा तिखट
- १ छोटा चमचा आमचुर पावडर
- १/२ छोटा चमचा धणे पावडर
- २ चमचे कोथिंबीर
- १/२ छोटा चमचा गरम मसाला
- चवीनुसार मीठ
- २ छोटे चमचे तेल
पुरी साठीचे साहित्य :
- १ १/२ (दीड) कप मैदा
- २ चमचे तेल मोहनासाठी
- चवीनुसार मीठ
- १/२ छोटा चमचा ओवा
- तळण्यासाठी तेल
स्टफ पुरीचे सारण बनविण्याची कृती : How to make stuffing for puri
- बटाटा उकडून त्याची साल काढून घ्यावी.
- नंतर बटाटे किसणीने किसून घ्यावी.
- गॅस वर पॅन गरम करत ठेवा.
- पॅन गरम झाल्यावर त्यात २ छोटे चमचे तेल घालून गरम करून घ्या.
- तेल तापल्यानंतर त्यात हिंग घालून त्यात किसलेला बटाटा घालून त्यात बडीशेप (जाडसर कुटून) घाला.
- नंतर बारीक कापलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट,आमचुर पावडर,धणे पावडर,गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून चांगले परतून घ्यावे.
- अश्या पध्दतीने पुरीचे सारण तयार करून घ्यावे.
पुरी बनविण्याची कृती : How to make stuffed aloo puri
स्टेप १ :
- एका बाऊल मध्ये मैदा चाळून घ्या. नंतर त्यात ओवा,चवीनुसार मीठ, गरम तेलाचे मोहन घालून चांगले मिक्स करून घ्यावे.
- नंतर पिठात थोडे-थोडे कोमट पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या. मळलेले पीठ ओल्या कपडयाने झाकून २० मिनिट मुरण्यासाठी ठेवा.
स्टेप २ :
- १५-२० मिनिटानंतर हाताला तेल लावुन मळलेले पीठ पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मळून घ्यावे.
- मळलेल्या पिठाचे छोटे-छोटे गोळे करून घ्यावे.
- त्यातील एक गोळा घेऊन त्याला पारीसारखा आकार द्या आणि त्या पारीत एक चमचाभर सारण भरून सगळ्या बाजुंनी व्यवस्थित बंद करून हलक्या हातांनी लाटुन पुरीचा/कचोरीचा आकार द्यावा.
- सारण भरून पुरी लाटताना हलक्या हातांनी लाटून घ्या, नाहीतर सारण बाहेर येईल. सगळ्या बाजुंनी समान लाटून घ्या.
- अश्याच प्रकारे सारण भरून सर्व पुऱ्या तयार करून घ्या.
स्टेप ३ :
- तयार केलेल्या पुऱ्या तळण्यासाठी कढईत आवश्यक तेवढे तेल तापत ठेवा.
- तेल तापल्यानंतर त्यात पुऱ्या सोडून मंद आचेवर दोन्ही बाजुंनी कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन होई पर्यंत तळून घ्या.
- पुऱ्यावर मध्ये मध्ये झाऱ्याने/चमच्याने तेल उडवावे, म्हणजे पुऱ्या व्यवस्थित फुलतात.
- उरलेल्या सर्व पुऱ्या अश्याच प्रकारे तळुन घ्या. तळलेल्या पुऱ्या टिशू पेपर वर ठेऊन घ्या .
- गरमागरम पुऱ्या दही आणि चटणी किंवा सौंस बरोबर सर्व्ह करा.
🌼 टिप :tips
- आपल्याला जेवढी मोठी किंवा छोटी पुरी करायची आहे त्याप्रमाणात पिठाची गोळे करून घ्या.
- पीठ तेल लावून चांगले मळून घ्या आणि सगळ्या बाजुंनी समसमान लाटून घ्या.
- मैद्या ऐवजी गव्हाचे पीठ वापरूनही पुऱ्या करता येतात.
- पुरीत आपण हिरवे मटार दाने वाफवून स्मॅश करून ही वापरू शकतो.
🌼 अन्य काही रुचकर रेसिपीस पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
0 टिप्पण्या