ड्राय मसाला कचोरी :कचोरी हा मधल्या वेळेला किंवा चहा बरोबर खाण्यासाठी सगळयांचा आवडता पदार्थ आहे. आंबटगोड चवीचा टाईमपास स्नॅक्स म्हणून प्रसिद्ध आहे. स्नॅकचे पदार्थ जेव्हा आपण घरी बनवतो तेव्हा त्याची मज्जा काही औरच असते.

बऱ्याचदा आपण बाहेरून तयार खाद्य पदार्थ आणतो पण ते पदार्थ पुरेशी स्वच्छता राखून बनवले जातातच असे नाही तसेच त्यात वापरल्या जाणाऱ्या पदार्थाच्या क्वालिटी बाबतचे मापदंड पाळले जात नाहीत. मग अश्यावेळी असे पदार्थ खाण्याने आपल्याला अपाय/नुकसान होऊ शकतात. त्यामुळे आपण घरच्याघरी हे पदार्थ केलेले जास्त चांगले. 

ड्राय मसाला कचोरी एकदा बनवली की पंधरा ते वीस दिवस टिकू शकते. चला मग बनवूया आपल्या सर्वाना आवडणारी अशी आंबट गोड चवीचे स्वादिष्ट कचोरी.

dry-masala-kachori-recipe


ड्राय मसाला कचोरी


बाहेरील कव्हर साठीचे साहित्य :Ingredients of Kachori outer cover 

  • २ कप मैदा 
  • ४ टेबल स्पन तेल/घी 
  • १/२ छोटा चमचा ओवा 
  • चवीनुसार मीठ 

मसाला (स्टफिंग) भरण्यासाठीचे साहीत्य : Ingredients of Kachori Stuffing 

  • १ कप पापडी/गाठीयां
  • १/२ कप बारीक शेव  
  • १/२ कप फ्राईड मूंगडाल
  • २ टी.स्पून तिखट पावडर  
  • १/४ टी. स्पून हळद पावडर 
  • १  टेबलस्पून धणे 
  • २ टेबल स्पून बडीशेप 
  • १ टेबल स्पून सफेद तेल 
  • २ टेबलस्पून मनुका
  • २ टेबल स्पून काजू-बदाम ऑप्शनल 
  • २ टेबलस्पून खजुर-चिंचेची गोड चटणी 
  • १ टी.स्पून गरम मसाला 
  • १/४ टी.स्पून काळीमिरी जाडसर भरड 
  • १ टी.स्पून आमचुर पावडर 
  • १ टी.स्पून खसखस
  • १ टी.स्पून साखर 
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल 


कचोरी बनवण्याची विधी :  How to Make dry Kachori Recipe 

स्टेप १:

  • सर्वप्रथम एका परातीत मैदा घेऊन त्यात ओवा,चवीनुसार मीठ, तेल घालून हाताने व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यावे. 
  • मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर मुठीत घेऊन दाबून बघा जर मिश्रणाचा गोळा बनला (बांइड होत असेल) तर मग समजावे मोहन बरोबर आहे.
  • नंतर आवश्यकते नुसार थोड-थोड पाणी घालून मिडीयम घट्ट पीठ मळून १/२ तास किचन टाॅवेलने व्यवस्थित तसेच झाकून ठेवा. 


कचोरीचे सारण तयार करण्याची कृती :

स्टेप २:

  • पापडी/गांठीया मिक्सर जार मध्ये घालून थोडी जाडसर पावडर करून घ्या.
  • काजू आणि बदाम मिक्सर जार मध्ये घालुन जाडसर भरड करून घ्या. 
  • एका पॅनमध्ये मंद आचेवर सफेद तील आणि बडीशेप,धणे,खसखस वेगवेगळे कोरडे १-२ मिनिट परतून घ्या.
  • सर्व साहित्य परतून झाल्यावर गॅस बंद करून प्लेट मध्ये काढून बाजूला ठेवून थंड करून द्या.
  • बडीशेप आणि धणे भाजून झाल्यावर त्यात एक चमचा साखर घालून खलबत्यातून थोडे जाडसर कुटून किंवा मिक्सर मधुन जाडसर वाटून घ्या . 

स्टेप ३ :  

  • एका पॅनमध्ये मध्यम आचेवर एक चमचा तेल टाकून गरम करून घ्या.
  • तेल गरम झाल्यावर त्यात खजूर-चिंचेची चटणी आणि जाडसर कुटलेले धणे,बडीशेप,सफेद तील, खसखस घालून १ मिनिट परतून घ्या.
  • नंतर त्यात गरम मसाला,तिखट,हळद पावडर आणि काजू-बदामची भरड, मनुका,काळीमिरी भरड पाउडर आणि आमचूर पाउडर घालून चांगले मिक्स करा. 
  • आता त्यात फ्राइड मूंगडाल,जाडसर वाटलेली गांठीया किंवा पापडी पावडर आणि बारीक शेव आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून एक मिनिट परतून घ्या.
  • मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर गॅस बंद करून ते एका प्लेट मध्ये पसरून ठेवा म्हणजे लवकर थंड होईल. 
  • कचोरीसाठी केलेले स्टफिंग थंड झाल्यावर सगळ्या मिश्रणाचे दोन्ही हाताच्या मदतीने गोल-गोल समसमान छोटे-छोटे गोळे ( बाॅल्स) बनवून घ्या. 
  • स्टफिंग बाॅल्स बनवताना गरज लागली तर त्यात १ छोटा चमचा तेल किंवा खजूर-चिंचेची चटणी मिक्स करून बाॅल्स बनवून घ्या. 
  • अश्याच प्रकारे सर्व बाॅल्स बनवून किचन टाॅवेलने व्यवस्थित झाकून ठेवा. 

स्टेप ४:

  • स्टेप १ मध्ये मळलेले पीठ पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मळून मऊ करून घ्यावे.
  • नंतर मळलेल्या पिठाचे छोटे-छोटे समसमान आकाराचे गोळे(बाॅल्स)करून किचन टाॅवेलने झाकून ठेवा. 
  • मळलेल्या(कणकेची)पिठाची एक गोळी घेऊन थोडी जाडसर अशी छोटी पुरी लाटून घ्या. 
  • लाटलेल्या पुरीच्या मधोमध स्टफिंगचा बाॅल किंवा गोळा ठेवून किनाऱ्यावर हल्का पाण्याचा हात लावून (मोदका प्रमाणे) त्याला पोटलीचा आकार देऊन सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद घ्या.
  • नंतर त्याला दोन्ही हाताच्या मदतीने गोल-गोल आकार देत कचोरी बनवून घ्या. 
  • अश्याप्रकारे सर्व कचोरी स्टफ करून घ्या. 

स्टेप ५ : 

  • कढईत पुरेश्या प्रमाणात तेल घालून गरम करून घ्या. 
  • तेल गरम झाल्यावर तेलात मावतील एवढया कचोऱ्याचे गोळे घालून मंद गॅसवर तळून घ्या.
  • सर्व बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • अश्याच प्रकारे बाकीच्या उरलेल्या सर्व कचोरी तळून घ्या. 
  • कचोरी तळल्यानंतर किचन पेपर वर काढून थंड करून घ्या. 
  • कचोरी थंड झाल्यावर हवाबंद (एअरटाईट) डब्यात भरून ठेवा. 

टीप: Tips 

  1. कचोरी करताना गाठीया/पापडीच्या जागी बेसन तूपावर सोनेरी रंगावर परतून ही घालू शकतो.
  2. कचोरी गोड आवडत असल्यास साखर/गुळ जास्त ही घालू शकतो.
  3. कचोरी तळताना तेल तापल्यानंतर मंद गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा, मोठ्या आचेवर तळल्यास क्रिस्पी होणार नाही. 
  4. गाठीया मध्ये मीठ असते त्यामुळे मीठ बेताचे घालावे. 


🌼 अन्य काही पॉप्युलर रेसिपीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


👉 चटपटीत मसाला शेंगदाणे रेसिपी पाहण्यासाठी येथे क्लिक करा . 


👉 क्रिस्पी खारी शंकरपाळी रेसिपी पाहण्यासाठी येथे क्लिक करा .