होममेड खस सरबत: वाळा किंवा खस एक अत्यंत गुणकारी सुगंधी औषधी वनस्पती आहे. खस सरबत मुख्यत्वे करून आपल्या शरीराची वाढलेली उष्णता व त्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी विशेष करून हे सरबत प्यायले जाते. आयुर्वेदामध्ये खस या वनस्पतीचे अनेक उपयोग/लाभ सांगितलेले आहेत.
खस मध्ये अनेक औषधीय गुण आढळतात जे आपल्या उत्तम आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. खसमध्ये अँटी -बॅक्टरीयल, अँटी-फंगल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी - ऑक्सिडेन्ट, उत्तेजना देणारे, मूत्र वर्धक इत्यादी लाभकारी औषधीय गुण आढळतात.
खस हे पित्त विकार, सर्दी- खोकला, त्वचा रोग, धातूरोग, उष्णतेचे विकार, स्वासा संबंधी रोग, ताप, हृदय रोग, उलटी, लघवीची जळजळ, रक्त विकार, डोकेदुखी, हार्मोनल समस्या, मांसपेशी संबधी समस्यामध्ये खूप लाभकारी व गुणकारी आहे .
खस सरबत पिल्याने शरीराला एनर्जी प्राप्त होते व बेचैनी कमी होऊन उत्साह वाढतो. उन्हाळ्यात उष्णतेच्या तक्रारी वरती रामबाण उपाय आहे. त्यामुळे अश्या बहुगुणी औषधीय गुणधर्म असणाऱ्या वाळा सरबत/खस सरबत आपण जरूर घरी करून त्याचा लाभ घ्यायला हवा.
खस सरबत
खस सिरपसाठी आवश्यक साहित्य : Ingredients of khus syrup
- १०० ग्राम खस ग्रास (वाळा )
- ६५० ग्राम साखर
- २ लिटर पाणी
खस सिरप बनवण्याची कृती :How to make khus syrup
स्टेप १ : खस सिरप बनविण्याची तयारी
- सर्वप्रथम खसचे ग्रास(गवत) घेऊन त्याची मूळ कात्रीने कापून घ्यावी.
- नंतर खस गवताला व्यवस्थित साफ करून त्यातील माती, खडे काढून पाण्याने चांगले दोन-तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यावे.
- खस चांगल्या प्रकारे धुऊन झाल्यावर त्याचे कात्रीने कापून बारीक-बारीक तुकडे करून घ्यावेत.
- बारीक तुकडे केल्यानंतर २ लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.
- रात्रभर भिजवलेली खस त्यातील पाण्यासकट एका भांड्यात टाकून उकळत ठेवा .
- जेव्हा त्यातील पाणी आटून अर्धे राहील (१ लिटर)तोपर्यंत उकळून घ्यावे.
- खसचे पाणी आटून अर्धे झाल्यावर गॅस बंद करा.
- या पाण्यामध्ये खसचा अर्क उतरलेला असल्यामुळे ते पाणी थंड झाल्यावर गाळून घ्यावे.
स्टेप २:
- एका पॅन मध्ये गाळलेला खसचा अर्क आणि साखर मिक्स करून मंद गॅसवर ठेवावे.
- साखर विरघळेपर्यंत सतत चमच्याने हलवत रहा.
- साखर विरघळल्यानंतर १ चमचा दुध टाका, म्हणजे पाका मधील कचरा निघून वरती तरंगेल तो चमच्याने काढून टाका.
- पाक घट्टसर होत आला की दोन बोटाच्या (अंगठा व तर्जनीच्या सहायाने) मध्ये पाकाचा एक थेंब चिटकवुन चेक करा.
- आपल्याला एकतारी पाक करायचा आहे,जेव्हा एकतारी पाक तयार होईल तेव्हा गॅस बंद करा.
- तयार खसचे सिरप थंड करून स्टरलाइज बाटलीत भरून ठेवा.
- आवश्यकतेनुसार पाण्यात खस सिरप मिक्स करून त्यात आवडत असल्यास लिंबाचा रस आणि भिजविलेले सब्जाचे बी घालून मिक्स करा.
- सर्व्ह करताना बर्फ घालून थंड-थंड खस सरबताचा आस्वाद घ्या .
टिप :Tips
- आपल्याला आवडत असल्यास सरबत मध्ये हिरवा रंग किंवा खस इसेन्स घालू शकतो.
- खसचे शरबत तयार झाल्यावर फ्रिज मध्ये स्टोर करून ठेवा.
- खस सिरप मध्ये साखरे ऐवजी गुळ ही वापरू शकतो.
🍀 खस (वाळा) सरबत पिण्याचे फायदे : Khus sharbat benefits
👉 एनर्जी:उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊन थकवा येतो त्यावेळेस खस सरबत पिल्याने थकवा कमी होऊन लगेच एनर्जी प्राप्त होते .
👉 दूषित रक्त:खस सरबत पिल्याने रक्त साफ होऊन मुरूम आणि उष्णते पासुन होणाऱ्या फोड्या-पुरळ कमी होण्यास मदत होते.
👉 रोगप्रतिकार शक्ती:वाळा सरबत पिल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते त्यामुळे आपण स्वस्थ राहतो व कमी वेळा आजारी पडतो.
👉 अनिद्रा:बऱ्याच लोकांना अनिद्रेचा त्रास असतो अश्यावेळी वाळ्याचे सरबत किंवा पाणी नियमित सेवन केल्याने हा त्रास हळू हळू कमी व्हायला लागतो.
👉 ताप:वाळ्यामधे अँटी -बॅक्टरीयल गुण असतात त्यामुळे ताप कमी करून आराम पडण्यास उपयुक्त आहे.
👉 डिप्रेशन:वाल्याच्या सरबताच्या सेवनाने मेंदूची कार्यक्षमता सुधारते व त्यामुळे तणाव, डिप्रेशन सारख्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.
👉 तोंड येणे:वाळा हा थंड प्रकृतीचा असल्यामुळे उष्णतेमुळे निर्माण होणारे आजार कमी होतात. तोंड येणे वा जिभेला भेगा पडणे यावर खूप लाभकारी आहे .
👉 ब्लड सर्कुलेशन : खसच्या सरबताच्या सेवनाने आपले ब्लड सर्कुलेशन चांगले राहते .
🌼 अन्य काही रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा .
👉 पाचक आणि पित्त शामक कोकम सरबत रेसिपी पाहण्यासाठी येथे लिंक वर क्लिक करा .
👉 आवळ्याचे हेल्दी आणि पाचक सरबत रेसिपी पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
0 टिप्पण्या