साबुदाणा वडा:  उपवासाचा सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे. मस्त क्रिस्पी टेस्टी व अबाल वृद्ध प्रत्येकाला हवा हवा सा वाटणारा असा हा चविष्ट साबुदाणा वडा म्हणजेच सर्वच खवैयांसाठी पर्वणीच असते. चला मग बनवूया कुरकुरीत साबुदाणा वडा.

How to make sabudana-vada-recipe in marathi

                          साबुदाणा वडा 

साहित्य :

  • दोन कप साबुदाणा 
  • पाच मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे 
  • चार चमचे राजगिरा पीठ/वरीचे पीठ 
  • एक कप शेंगदाण्याचे कूट 
  • आठ हिरव्या मिरच्या 
  • अर्धा चमचा आलं पेस्ट 
  • एक चमचा जिरे 
  • कोंथिबीर 
  • चवीनुसार मीठ 
  • तळण्यासाठी तेल /तूप 


साबुदाणा वडे बनविण्याची कृती :

स्टेप १:

  • साबुदाणा पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यातले स्टार्च पूर्णपणे निघून गेला पाहिजे. 
  • नंतर साबुदाण्या वरती थोडे पाणी ठेवून साबुदाणा साधारणतः  तीन ते चार तास भिजत ठेवावा. 

स्टेप २:

  • उकडलेले बटाटयाची साल काढून चांगला स्मॅश करून घ्यावा. 
  • हिरवी मिरची आणि आले थोड जाडसर वाटून घ्यावे. 
  • शेंगदाणे चांगले भाजून त्याची सालं काढून मिक्सरमधून जाडसर कूट करावे. 
  • साबुदाणा चांगला फुलल्यानंतर, त्यातला थोडा साबुदाणा मिक्सर मधून थोडा फिरवून घ्यावा. 
  • नंतर एक बाऊल घेऊन त्यात न वाटलेला अख्खा साबुदाणा, वाटलेला साबुदाणा, स्मॅश केलेला बटाटा, जाडसर कुटलेले आल-मिरची, जिरं,बारीक चिरलेली कोंथिबीर,राजगिरा पीठ,मीठ,शेंगदाण्याचे कूट सर्व साहित्य एकत्र करून चांगले मिक्स करून तुपाच्या हाताने मळून घ्यावे. 
  • नंतर हाताला तेल लावून गोळे करून हातावर थापून टिक्कीचा आकार द्यावा किंवा केळीच्या पानावर थापून घ्यावे. 
  • कढईत तेल गरम करून त्यात वडे मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन होई पर्यंत तळून घ्यावेत. 
  • गरमागरम वडे हिरवी चटणी आणि दह्याबरोबर सर्व्ह करावेत. 
 टिप :
  • आवडत असल्यास साबुदाणा वड्यात लिंबाचा रसही घालू शकतो. 
  • हिरवी मिरचीच्या जागी लाल मिरची  किंवा काळीमिरी पावडर ही वापरू शकतो.