how to make moong-dal-dhokla-recipe in marathi

मुगडाळ ढोकळा रेसिपी:मुगडाळ ही प्रोटीनचा खूप मोठा स्रोत आहे. मुगडाळीचा ढोकळा आयरनने भरपूर असलेली  हेल्दी रेसिपी आहे, शिवाय ही पचायला हल्का असल्यामुळे एक डाएट रेसिपी म्हणून एक उत्तम पर्याय आहे. चला मग बनवूया अशी ही हेल्दी ढोकळा रेसिपी. 

how to make moong-dal-dhokla-recipe in marathi

                        मुगडाळ ढोकळा रेसिपी 

साहित्य :

  • १ कप मुगडाळ 
  • १ छोटा चमचा आलं लसून
  • १ चमचा हिरवी मिरची पेस्ट 
  • १ चमचा बेसन 
  • 2 चमचे रवा 
  • १ १/२ छोटा चमचा इनो फ्रुट सॉल्ट 
  • चिमुटभर हिंग
  • १/४ छोटा चमचा हळद 
  • २ मोठे चमचे दही /लिंबू 
  • १ चमचा तेल 
  • स्वादा नुसार मीठ 

फोडणीसाठीचे  साहित्य :

  • तेल  
  • २ मिरच्या 
  • चार पाच कडीपत्याची पाने 
  • दोन छोटे चमचे साखर 
  • एक चमचा तीळ 
  • एक छोटा चमचा मोहरी 
  • अर्धा छोटा चमचा जीर 

बनविण्याची कृती :

  • प्रथम मुगडाळ चांगली धुवून २ ते ३ तास भिजत ठेवावी. 
  • नंतर पाण्यातून काढून थोड़े पानी घालून हल्की जाडसर वाटून घ्यावी. 
  • वाटलेली मुगडाळीचे बैटर (जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे) मिडीयम असावे, साधारणतः  डोसाच्या प्रमाणे कन्सिस्टेन्सी असावी. त्यात बेसन, रवा घालून चांगले मिक्स करून हे बैटर कमीत कमी एक तास तसेच झाकून ठेवून द्यावे. 
  • एका बाउल मध्ये वरील बैटर घेऊन त्यात आलं मिरची लसूण पेस्ट, दही,हळद,हिंग,मीठ,गरम तेलाचे मोहन घालून चांगले मिक्स करून घ्यावे. 
  • कुकर किंवा स्टीमर गरम करत ठेवा. (कुकर मध्ये करत असाल तर कुकरची शिटी काढून ढोकळा वाफवावा)  
  • मिश्रण चांगले मिक्स झाल्यावर त्यात फ्रुट सॉल्ट घालून त्यावर एक छोटा चमचा पाणी घालावे, म्हणजे इनो चांगला फसफसेल व चांगला फुलू शकेल, नंतर मिक्स करून लगेच थाळीत ट्रान्सफर करावे. 
  • थाळीला तेलाने ग्रिसींग करून त्यावर मिश्रण ओतून १५ ते २० मिनिट वाफवून घ्यावे. 
  • वीस मिनिटानंतर ढोकळ्यात सूरी घालून बघावी, सुरीला ढोकला चिकटला तर समजावे की ढोकळा शिजला, नाही तर पुन्हा ५ मिनिटे वाफवा. 
  • नंतर फोडणी पात्रात तेल गरम करून त्यात मोहरी,जीर,तीळ,कढीपत्ते,मीठ,लिंबू रस,मिरचीचे लांबट तुकडे चांगले परतल्यावर त्यात साखर घालून अंदाजाने ढोकल्याच्या प्रमाणानुसार पाणी घालावे (साधारणतः पाव कप) आणि एक उकळी आणावी.  
  • ढोकळा गार झाल्यावर त्यावर तयार फोडणी ढोकळ्यावर पसरवून ढोकळ्याचे तुकडे कापावे . 
  • वरून आपल्या आवडीनुसार ओल खोबरं, कोंथिबीर, बारिक शेव घालून सजवावे आणि हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करावे. 

टीप :

  1. मूगडाळ ढोकळा रेसिपी मध्ये लसूण आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल. 
  2. ढोकळा नेहमी गार झाल्यावरच त्याचे तुकडे करावे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या