अंजीर मावा बर्फी:अंजीर औषधी गुणांनी भरपूर असलेले गुणकारी फळ आहे. या मध्ये कॅल्शियम,व्हिटॅमिन ए,बी,सी, फेनोल, ओमेगा-३,ओमेगा- ६ भरपूर प्रमाणात असतात.चला मग अश्या बहुगुणी अंजीराची स्वादिस्ट व पौस्टिक बर्फी बनवूया. 


anjeer mawa Burfi-recipe
Anjeer Mawa Burfi

                                     अंजीर मावा बर्फी 

अंजीर बर्फी साठी साहित्य :

  • २५० ग्रॅम मावा /खवा 
  • ६ ते ७ सुके अंजीर 
  • तीन टेबलस्पून साखर 
  • एक टेबलस्पून तूप 
  • १० ते १२ काजू ,बदाम,पिस्ता 
  • १ टी स्पून वेलची पावडर 

बर्फी बनवण्याची कृती :

स्टेप १: 

  • प्रथम अंजीर गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा.
  • नंतर अंजीराचे बारीक बारीक तुकडे करून घ्या.  
  • नंतर मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या.
  • तसेच काजू व  बदामाचे बारीक तुकडे /जाडसर भरड करून घ्या. 

स्टेप २:

  • नॉनस्टिक पॅन थोड पाणी, साखर व  मध्ये अंजीरची जाडसर आणि साखर मंद गॅसवर परतून घ्या.
  • साखर विरघळे पर्यंत सतत हलवत रहा.  
  • नंतर त्यात मावा, काजू, बदामाची भरड, तूप घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत परतत रहा. 
  • मिश्रण घट्ट होऊन पॅनच्या कडा सोडू लागले की, त्यात वेलची पावडर घालून चांगले मिक्स करा. 
  • थाळीला तूप लावून मिश्रण त्यात घालून दोन तास सेट करायला ठेवा. 
  • मिश्रण थोड थंड झाल्यावर सुरीच्या मदतीने तुकडे पाडून घ्या.  
  • वरून वाटल्यास चांदीचा वर्ख, ड्रायफ्रूट लावून सजवा. 
  • अश्या प्रकारे स्वादिस्ट अंजीर बर्फी तयार आहे.  

टीप :

  • जर आपल्याया जास्त गोड नको असेल तर साखरेच प्रमाण कमी केलात तरी चालेल. 
  • आपल्याला जर वाटल तर यामध्ये सूर्यफुलाच्या बिया,तीळ, टरबूजाच्या बिया, भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकतो. 


🌼 अंजीर बर्फीचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे : Benefits Of Anjeer Burfi 

  • पोटेंशिअमचा चांगला स्रोत आहे, पोटेंशिअम आणि सोडियम प्रमाणाला बॅलन्स करण्यास सहायक आहे  
  • ब्लड प्रेशर कंट्रोल होतो, हृदयासाठी उपयुक्त आहे. 
  • तरुण मुलींना PMS Issue (मासिकपाळी संदर्भातील समस्या) मध्ये अंजीर खाण्याचे सुचवले जाते. 
  • बद्धकोष्ठता वर अंजीर उपयुक्त असते.