बीटरूट हलवा रेसिपी: गाजराच्या हलव्या प्रमाणेच बीटाचा हलवाही स्वादिष्ट आणि पौस्टिक गुणांनी भरपूर असतो. बीटमध्ये असणाऱ्या उच्च औषधीय मूल्यांमुळे बिट आपल्या रोजच्या खाण्यात असायलाच हवा.
बीटमध्ये असणारे पौस्टिक गुण: नायट्रेटस, फायबर, फॉलिक ऍसिड , आयरन, व्हिटॅमिन (बी १), (बी२),(सी), सोडियम,कॅल्शियम,क्लोरीन,बेटासायनिन,सोडियम,फॉस्फोरस,यासारखी शरीराला उपयुक्त घटक असल्यामुळे बीट हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
बीटात प्राकृतिक साखर असते त्यामुळे शरीराला पुरेश्या प्रमाणात ऊर्जा मिळते. त्यामुळे आपल्या आहारात बीटाचा समावेश जरूर करावा,अश्या ह्या बहुगुणी बीटाचा हलवा आपण पाहूया.
बीटमध्ये असणारे पौस्टिक गुण: नायट्रेटस, फायबर, फॉलिक ऍसिड , आयरन, व्हिटॅमिन (बी १), (बी२),(सी), सोडियम,कॅल्शियम,क्लोरीन,बेटासायनिन,सोडियम,फॉस्फोरस,यासारखी शरीराला उपयुक्त घटक असल्यामुळे बीट हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
बीटात प्राकृतिक साखर असते त्यामुळे शरीराला पुरेश्या प्रमाणात ऊर्जा मिळते. त्यामुळे आपल्या आहारात बीटाचा समावेश जरूर करावा,अश्या ह्या बहुगुणी बीटाचा हलवा आपण पाहूया.
बीटरूट हलवा
बीटच्या हलव्यासाठीचे साहित्य:Ingredient of Beetroot Halwa
- पाव किलो बीट
- १०० ग्रॅम मावा/खवा
- १/२ कप दूध
- १/२ वाटी साखर
- दोन चमचे तूप
- १/२ छोटा चमचा वेलची,जायफळ पावडर
- ५ ते ६काजू ,बदाम,पिस्ता
बीटाचा हलव्याची कृती :
- बीट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या,नंतर त्याची साल काढून घ्या.
- बीटाच्या साल काढून झाल्यानंतर बीट किसून घ्या .
- काजू,पिस्ता, बदामाचे पातळ काप करून,तुपावर हलका लालसर होईपर्यत परतून घ्या. ड्रायफ्रूट्स परतल्यानंतर एका डिश मध्ये काढून ठेवा .
- एक बुडाची कढई किंवा नॉनस्टिक पॅन गॅसवर गरम करत ठेवा .
- कढई गरम झाल्यावर त्यात एक चमचा तूप टाकून बीटाचा किस ५ मिनिट मध्यम गॅस वर सतत चमच्याने परतून घ्या.
- बीटाचा किस थोडा नरम झाला आहे का हे चमच्याने दाबून चेक करा .
- नंतर त्यात दूध घालून चांगले मिक्स करून शिजवून घ्यावा,बीटाचा किस शिजला की त्यात साखर घालून चांगले मिक्स करून घ्या .
- नंतर मिश्रण घट्ट होई पर्यंत परतून घ्या,हलवा चिकटू नये म्हणून सतत चमच्याने हलवत रहा.
- मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात खवा,उरलेले तूप घालून, जरावेळ शिजवावा . नंतर जायफळ आणि वेलची पावडर टाका .
- हलवा पूर्णपणे घट्टसर झाल्यावर खाली उतरून घ्या.
- सर्व्ह करताना काजू ,बदाम, पिस्त्याचे कापाने सजवा आणि गरम किंवा थंड कसाही हलव्याचा आस्वाद घ्या .
✿ टीप :Tips
- गाजराचा हलवा आपण नेहमीच करतो,बीट हे फारसे खाल्ले जात नाही,बीटाचा हलवा करून बघायला हरकत नाही .
- बीट हे साधारण गोडच असते,त्यामुळे आपल्या आवडी नुसार साखर कमी जास्त करू शकतो.
- हलव्यात साखरे ऐवजी गूळ ही वापरू शकतो .
- फ्रिज मध्ये हलवा ४-५ दिवस चांगला राहतो .
- बीटच्या हलव्यात मिल्कमेड ही घालून हलवा करू शकतो .
✿ बीटच्या हलव्याचे आरोग्य दायक फायदे : Benefits Of Beetroot Halwa
- आपली शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
- बीटात कर्करोग विरोधक तत्व असतात.
- मधुमेह : बीट मध्ये अल्फा-लिपोईक ऍसिड म्हणून ओळखला जाणारा अँटिऑक्सिडंट असतो. तो आपल्या ग्लुकोजची पातळी कमी करतो त्यामुळे मधुमेही रुग्णांना त्याचा चांगला फायदा होतो.
- पाचनतंत्र : भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते .
- रक्तदाब: बीटरूट रस प्यायल्याने रक्तदाब कमी व नियंत्रित होण्यास मदत होते .
- डेमेंशिया आजार : बीटाचा रस प्यायल्याने मेंदूतील ऑक्सिजीकरण सुधारून प्रौढांमधील डेमेंशिया ह्या आजारात चांगला फायदा होतो .
- हिमोग्लोबिन : बीटा मध्ये भरपूर प्रमाणात आयरन असते त्यामुळे हिमोग्लोबीनची कमतरता भरून निघते .
- गर्भवती स्त्रियांसाठी योग्य असा आहार आहे .
- कोलेस्ट्रॉल: शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, हृदयरोगा पासून आपला बचाव करते . .
0 टिप्पण्या