कोहळ्याचे घारगे/ कोहळ्याची पुरी: (Kohala Gharge Recipe) हा पदार्थ तसा महाराष्ट्रातील एक अत्यंत पारंपरिक पदार्थ आहे. कोहळा हा आयुर्वेदानुसार खूप गुणकारी वनस्पती/फळ आहे. गुणांनी थंड असून शरीराला बळदायक, तेज आणि शीतलता देणारी गुणकारी औषधीय फळ आहे. कोहळा हा धातुपोषक, पित्तनाशक असतो. चला मग अश्या गुणकारी कोहळ्याचे घारगे/ पुरी करूया.
कोहळ्याचे गोड घारगे
कोहळा घारग्यासाठी लागणारे साहित्य :
- २ वाटया कोहळ्याचा/ भोपळ्याचा किस
- १ वाटी किसलेला गूळ
- गव्हाचे पीठ (मिश्रणात मावेल इतके )
- तांदळाचे पीठ (कणकेच्या पिठाच्या निम्मे )
- दोन चमचे रवा
- १/४ टी स्पून हळद
- एक छोटा चमचा वेलची जायफळ पावडर
- एक चमचा तूप
- चिमूटभर मीठ
- तळण्यासाठी तेल
घारगे बनविण्याची कृती :
- सर्वप्रथम कोहळा धुऊन, त्याचे तुकडे करून किसणीने किसून घ्या.
- कढईत एक चमचा तूप गरम करून त्यात कोहळ्याचा किस घालून मिनिटभर परतून घ्यावा.
- नंतर त्यात किसलेला गूळ घालून मंद आचेवर शिजवून घ्या.
- गूळ विरघळल्यावर त्याला पाणी सुटेल, कोहळ्याचा किस मऊसर शिजवून एक वाफ काढा.
- गुळाचे पाणी कोहळ्याने पूर्णपणे शोषून घेईपर्यंत शिजवून घ्यावे. शिजल्यानंतर मिश्रण चांगले एकजीव होईल.
- कोहळ्याचा किस शिजल्यावर गॅस बंद करून किस थोडा थंड करून घ्या.
- नंतर त्यात चवीपुरते मीठ,चार चमचे तेल,हळद,वेलची जायफळ पावडर, मावेल इतकी कणिक आणि तांदळाचे पीठ, रवा घालून एकत्र करून घट्ट मळून थोडा वेळ तसेच झाकून ठेऊन मुरू द्यावे. (साधारणपणे कणकेच्या अर्धे तांदळाचे पीठ घालावे )
- घारगे लाटले जात नाहीत,ते थापूनच करावे लागतात.
- एका प्लास्टिकच्या कागदावर किंवा ओलसर रुमालावर लिंबाच्या आकारा एवढा पिठाचा गोळा घेऊन त्यावर थापून गोल पुरी एवढा आकार द्यावा.
- घारगे जरासे जाडसरच थापावे,कारण पातळ थापले तर घारगे फुगत नाहीत व कडक होतात.
- कढईत तेल तापत ठेवावे, कढईत कणभर (थोडेसे) पीठ टाकून पाहावे. पीठ लगेच तेलावर येऊन तरंगू लागले तर समजावे तेल तळण्यासाठी तयार आहे .
- तेल तापले की मंद गॅसवर तेलात कढईच्या आकारमाना नुसार एक-एक करून घारगे/पुरी सोडावे.
- घारग्या वर मध्ये मध्ये झाऱ्याने तेल उडवावे,म्हणजे ते व्यवस्थित फुलून येतील .
- घारगे स्वतःहून तळून तेलावर येत नाही तोवर त्याला उलटू नये.
- घारगे दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.
- अश्या प्रकारे कोहळ्यांचे घारगे तळून झाल्यावर किचन पेपर (टिशु ) वर काढून घ्या.
- गरमा-गरम कोहळ्याचे घारगे(Kohala Gharge Recipe) काळ्या वाटण्याची उसळ किंवा दही आणि लाल चटणी बरोबर सर्व्ह करावेत.
टिप :Tips
- कोहळ्याचे घारगे थोडे नरम हवे असतील तर कणकेच्या निम्मे तांदळाचे पीठ घ्यावे. थोडे कडक हवे असतील तर तांदळाच्या पिठाच्या निम्मे गव्हाचे पीठ घ्यावे.
- घारगे मंद ते मध्यम आचेवर तळावेत कारण मोठ्या आचेवर तळले तर बाहेरून लगेच लाल होतील आणि आतून कच्चेच राहतील.
- कोहळा प्रमाणे आपण लाल भोपळ्याचेही घारगे अशाच प्रकारे करू शकता.
- घारगे जास्त गोड आवडत असतील तर गूळाचे प्रमाण वाढवले तरी चालेल .
- आपण घारगे करून फ्रिज मध्ये ही २-३ दिवस स्टोर करू शकतो.
💮 कोहळ्यापासून मिळणारे आरोग्यवर्धक फायदे : Benefits Of Pumpkin/ Winter Melon
👉 मुलांच्या वाढीसाठी : कोहळ्या मध्ये सप्तधातूंचे पोषण करणारे गुणधर्म असल्यामुळे लहान मुलांच्या वाढी साठी तसेच बुद्धिवर्धनासाठी याचे नियमित सेवन करावे.
👉 मज्जासंस्थेसाठी : आहारात सूप किंवा रसाच्या स्वरूपात ह्याचे सेवन केल्याने मज्जासंस्थेची कार्यक्षमता
वाढते.
👉 हृदयविकार : कोहळ्याचे सेवन केल्याने हृदयाला बळकटी प्राप्त होते.
👉 मूळव्याध : बद्धकोष्ठता तसेच मूळव्याधीचे त्रास असणाऱ्यांनी कोहळा अवश्य खावा .
👉 उष्णतेचा त्रास किंवा पित्ताचा त्रास : उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा असणाऱ्यांनी कोहळा खाल्याने
पित्ताचा तसेच उन्हाचा त्रास कमी होतो .
👉 कृश/दुर्बल व्यक्तीसाठी : कोहळा व कोहळ्यापासून बनविलेले पदार्थ नियमित खाल्याने धातुदौबल्य दूर होऊन
शरीराचे पोषण होते.
👉 रक्तदोष तसेच वातविकार: रक्तदोषावर तसेच वातविकारांवर कोहळा अत्यंत गुणकारी आहे.
0 टिप्पण्या