Katachi Amti Recipe | Maharashtrian amti| Easy Aamti| Puranpoli amti

कटाची आमटी रेसिपी : कटाची आमटी ही होळीच्या सणाच्या दिवशी बनवल्या जाणाऱ्या पुरणपोळीच्या बरोबर खाल्ली जाते. महाराष्ट्रात कटाची आमटी ही एक पारंपरिक रेसिपी आहे. महाराष्ट्रात ही वेगवेगळ्या पध्दतीने बनविली जाते.

पूरणपोळी बरोबर कटाची आमटी बनवायची असल्यास डाळ शिजवताना डाळीच्या पाचपट पाणी घालून डाळ शिजवतात. जेणे करून हे पाणी आपण कटाची आमटी करण्यासाठी वापरू शकतो. पुरणपोळी बरोबर आंबट गोड चवीची ही कटाची आमटी अंत्यत स्वादिस्ट आणि खमंग लागते. कटाच्या आमटीला येळवणीची आमटी असे ही काही ठिकाणी संबोधले जाते.


Katachi Amti Recipe


कटाची आमटी रेसिपी 


🌼  कटाची आमटी बनवण्याची पहिली पद्धत :

आमटीसाठी आवश्यक साहित्य : Ingredients Of Katachi Amti 

  • १/२ कप चणाडाळ 
  • १ छोटया आकाराचा कांदा 
  • २ टेबल स्पून सुके खोबर 
  • २ टेबल स्पून ओले खोबर 
  • १/२ इंच दालचिनीचा तुकडा
  • २-३ काळीमिरी 
  • १ लंवग
  • ४-५ लसूण पाकळ्या 
  • १ टी स्पून जीरे
  • 1 टी स्पून धणे 
  • १ चमचा लाल तिखट
  • १ टी स्पून गोडा मसाला
  • १/४ टी स्पून हळद
  • २ चमचा चिंचेचा घट्ट कोळ 
  • २ चमचा गुळ 
  • कोथिंबीर 
  • स्वादानुसार मीठ 

फोडणीसाठीचे साहित्य :

  • २ टी.स्पून तेल
  • १/२ टी स्पून मोहरी 
  • १/२ टी स्पून जीरे 
  • १/२ टी स्पून हिंग 
  • १ तमालपत्र 
  • ४-५ कढीपत्ता 

कटाची आमटी बनविण्याची कृती:  How to Make Katachi Amti

स्टेप १ :  

  1. चण्याची डाळ १ तास पाण्यात भिजत घाला. 
  2. चण्याची डाळ चांगली भिजल्यानंतर कूकर मध्ये पाणी घालून नेहमी प्रमाणे मऊसर शिजवून घ्या.
  3. शिजलेली चणाडाळ चांगली घोटून घ्या.

स्टेप २ : 

  1. पॅन मध्ये मंद गॅसवर किसलेले सुके खोबरे आणि ओले खोबरे दोन्ही वेगवेगळे हल्का लालसर परतून घ्यावे.
  2. खोबर परतून झाल्यावर प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यावे.
  3. नंतर थोड्या तेलावर लंवग,दालचिनी आणि काळीमिरी,धने वेगवेगळे मंद गॅसवर परतून घ्या, नंतर एका प्लेट मध्ये काढून बाजूला ठेवा. 
  4. नंतर कांदा पातळ कापून घेऊन तेलावर परतून घ्या.  नंतर लसूण ही तेलावर परतून घ्या.

स्टेप ३ : 

  1. आता भाजलेले सुके खोबरे, ओले खोबरे, कांदा,लसूण आणि लवंग, दालचिनी,काळीमिरी, 1/2 टी स्पून जीर, कोथिंबीर सर्व साहित्य एकत्र करून मिक्सर मधुन बारिक वाटून मसाला करून घ्या. 

स्टेप ४ : 

  1. एका पातेल्यात तेल टाकून गरम करून घ्यावे.
  2. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी,जीर,हिंग,कढीपत्ता,तमालपत्र, लाल तिखट घालून परतून घ्यावे.
  3. नंतर त्यात (स्टेप ३ मध्ये) वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा.
  4. नंतर त्यात हळद,गोडा मसाला घालून पुन्हा परतून घ्या. जितका मसाला चांगल्या प्रकारे तेलावर परतला जाईल तितके चांगल्या प्रकारे तरी सुटून येईल. 
  5. आता घोटलेली चणाडाळ घालावी आणि आवश्यक तेवढे पाणी घालावी. डाळीत थोडे जास्त पाणी लागते कारण डाळ थंड झाल्यावर घट्ट होते. कटाची आमटी ही थोडी पातळच असते. 
  6. चवीनुसार मीठ घालून मंद गॅसवर ठेवून एक उकळी आणावी.
  7. नंतर चिंचेचा कोळ आणि गुळ घालून चांगले उकळून घ्यावे.
  8. चांगली उकळी आल्यावर चिरलेली कोंथिबीर घालावी. 
  9. गरमागरम तयार कटाची आमटी पुरणपोळी किंवा गरम-गरम भाताबरोबर बरोबर सर्व्ह करावी. 
🌼 कटाची आमटी बनवण्याची दुसरी पद्धत :  
  • पुरण पोळी करण्यासाठी चण्याची डाळ १ तास पाण्यात भिजत ठेवा, म्हणजे डाळ लवकर शिजते.  
  • डाळ भिजल्यानंतर शिजविताना त्यात पाचपट पाणी घालून वरून एक छोटा चमचा तेल घालून मऊसर शिजवून घ्यावी.
  • डाळ शिजल्यानंतर पाणी चाळणीने गाळून वेगळे काढून ठेवावे आणि त्या पाण्याचा वापर आमटी बनवण्यासाठी करावा. 
  • कटाची डाळ घट्ट हवी असल्यास शिजलेल्या डाळी पैकी थोडीशी डाळ बाजुला काढून व्यवस्थित घोटून घ्यावी व आमटी करताना त्यात मिक्स करावी. 
  • उरलेली बाकीची डाळ आपण पुरण पोळी बनवण्यासाठी वापरू शकतो.
  • त्यानंतर आमटी बनवण्याच्या पहिल्या पद्धतीमधील स्टेप २, स्टेप ३ आणि स्टेप ४ मध्ये केलेल्या कृती प्रमाणे कटाची आमटी करावी. 
  • झणझणीत आमटीत कोंथिबीर आणि ओल खोबर वरून घालून गरमागरम सर्व्ह करा . 

टीप :Tips 

  • कटाची आमटी पुरणपोळी बरोबर खाल्ली जाते. पुरणपोळी करताना चणाडाळीत पाचपट पाणी घालून शिजल्यावर त्यातील जास्तीचे पाणी चाळणीत निथळून घेतात यालाच कट म्हणतात.
  • ओल खोबर किसून आमटी वरून ही घालू शकतो. 
  • चिंचेचे कोळाच्या जागी कोकम(सोल)ही कटाच्या आमटीत घालू शकतो. 
  • फोडणीत 1/4 टी स्पून मेथी दाणे ही घालू शकतो. 

🌼 अन्य काही रेसिपीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा .

👉 होळी स्पेशल स्वादिष्ट पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी येथे क्लीक करा . 

👉 लज्जतदार व्हेजिटेबल कुर्मा रेसिपी पाहण्यासाठी येथे क्लीक करा . 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या