पेरू फ्रुट सरबत : पेरूचे स्वादिष्ट व आरोग्यदायी सरबत आपल्या आरोग्यासाठी खूप लाभकारी आहे. पेरू हे एक अदभूत फळ आहे. पेरूचे नियमित सेवन केल्यास पावसाळी, हिवाळ्याच्या दिवसात होणाऱ्या वेग-वेगळ्या व्हायरल पासून बचाव करते. तसेच पेरूचे जूस सेवन केल्याने बद्धकोष्टता/मलावरोध दूर होण्यास मदत होते. त्यामुळे पेरू कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जरूर खावा. पेरूला  भारतामध्ये काही ठिकाणी अमरूद,जाम म्हणून सुद्धा संबोधले जाते.  

पेरू थंड गुणधर्माचा असल्यामुळे उन्हाळयात याचे सेवन विशेष फायदेशीर असते. पेरू हे आंबट व गोड असे फळ आहे. पेरू मध्ये व्हिटॅमिन 'क' 'अ 'बी-३,बी-६' असते.  त्याच बरोबर कॅल्शियम,फॉस्फोरस,ग्लुकोज,लोह आणि मॅग्नेशियम, पोटेशियम, अँटिऑक्सिडंट,अँटी बॅक्टेरियल हे गुणधर्म असतात.

संत्र्यापेक्षा पेरू मध्ये चार पट जास्त व्हिटॅमिन सी असते. पेरूचे सरबत मध्ये आरोग्याच्या दृष्टीकोनातुन अनेक फायदे आहेत. चला मग बनवूया गुणकारी पेरूचे चविष्ट व लाभकारी सरबत . 




peru fruit sarbat recipe
पेरुचे सरबत 



पेरूचे सरबत बनवण्याची पहिली पद्धत : 

हे पेरूचे सिरप आपण प्रिसर्व / टिकवू शकतो व गरजे प्रमाणे सिरप टाकून सरबत तयार करू शकतो.

पेरूच्या सिरपचे साहित्य : Guava syrup Ingredients  

  • ६ पेरू 
  • साखर (रसाच्या निम्मी साखर) 
  • चिमूटभर सोडियम बेंझॉइट 

पेरू सिरप बनवण्याची कृती : How to make Guava Syrup Recipe 

स्टेप १ :

  • चांगले पिकलेले मऊ पेरू घेऊन चांगले धुवून व नंतर त्याची साले काढून घ्या.  
  • पेरूची साल काढून झाल्यावर त्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. 
  • मिक्सरच्या भांडयात टाकून बारीक पेस्ट करून घ्यावी. 
  • नंतर गाळणीने गाळून रस वेगळा काढावा.

स्टेप २ : 

  • पॅन मध्ये गाळलेला रस रसाच्या निम्मी साखर घालून (मंद आचेवर) साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत राहावे.  
  • साखर पूर्णपणे विरघळल्यानतंर २-३ मिनिट रस थोडा घट्ट होईपर्यंत शिजवावा. 
  • रस घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून या मिश्रणाला/ सिरपला थंड होऊ द्यावे.  
  • हे सिरप थंड झाल्यावर त्यात सोडियम बेंझॉइट मिक्स करून घ्यावे. 
  • नंतर तयार झालेल्या पेरूचे सिरप निर्जंतुक केलेल्या हवाबंद बाटलीत भरून ठेवा.  
  • पेरूचे सरबत करताना १ ग्लास थंड पाण्यात २-३ चमचे पेरूचे सिरप मिक्स करून त्यात १/२ चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ, चाटमसाला मिक्स करून सरबत करावे. 

----------------------------------------------------

पेरूचे सरबत बनवण्याची दुसरी पद्धत : 

पेरूचे ही इन्स्टंट जूस बनवण्याची पद्धत आहे व हा जूस लगेच करून पिण्यासाठीच आहे. तो आपण टिकवू शकत नाही कारण या पेरूच्या जूसमध्ये कोणत्याच प्रकारचे प्रीसर्व्हेटिव्ह वापरले नाही.

पेरूचे सरबत/जुस साहित्य : Ingredients of Guava Sharbat  

  • २ पेरू 
  • २ चमचे साखर (चवीनुसार)
  • १/२ छोटा चमचा काळ मीठ  
  • २ कप पाणी 
  • १ छोटा चमचा लिंबू रस
  • १/२ इंच आल्याचा तुकडा 

पेरूचे सरबत बनवण्याची कृती : How to Make Guava Drink  

  • सर्वप्रथम चांगले पिकलेले पेरू घेऊन चांगले धुवून, त्याची साल काढावी. 
  • आल्याची साल काढून त्याचे बारीक तुकडे करावे. 
  • पेरूचे बारीक तुकडे करून,मिक्सर जार मध्ये घेऊन त्यात साखर, मीठ, आल्याचे बारीक तुकडे, १/२ कप पाणी, लिंबाचा रस घालून बारीक वाटून पेस्ट करून घ्यावी. 
  • नंतर वाटलेले मिश्रण गाळून घ्यावे. 
  • नंतर त्यात उरलेले थंड पाणी मिक्स करून घ्यावे. 

टीप : Tips 

  1. आपल्या आवडी नुसार साखर कमी जास्त करू शकतो. 
  2. पेरूच्या सरबता मध्ये आल्याऐवजी चाटमसाला ही घालू शकतो.
  3. लाल पेरू ऐवजी साधे पेरू ही वापरू शकतो.
  4. सरबत मध्ये पुदिन्याची पाने ही घालू शकतो.  
  5. सरबत मध्ये लाल मिरची पावडर किंवा काळीमिरी पावडर ही घालतात.  

 🌼 पेरू फ्रूट सरबत पिण्याचे फायदे: Health Benefits of Guava/Peru fruit juice  


👉 कॅन्सर: पेरू मध्ये अँटिऑक्सिडेन्ट असल्यामुळे कॅन्सर पेशींचा प्रसार होण्यास अटकाव करते. विशेष करून स्तनाचा व प्रोस्टेट कॅन्सर मध्ये लाभकारी होऊ शकतो. 

👉 रोगप्रतिकारक शक्ती वाढ: पेरूमध्ये विपुल प्रमाणात व्हिटॅमिन-सी असते. पेरू/पेरूचे सरबत नियमित पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळे बऱ्याच प्रकारच्या रोगा पासून बचाव होतो.

👉दस्त / संग्रहणी: पेरू मध्ये अँटी-माइक्रोबियल आणि अँटी-पास्मोडिक असल्यामुळे दस्त(संग्रहणी) मध्ये पेरुचे सरबत लाभकारी असते.

👉ताण तणाव कमी करतो: पेरू मध्ये मॅग्नेशियम असते त्यामुळे शरीरातील नसा व मासपेशीना आराम मिळतो व ताण-तणाव बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

👉ब्लड प्रेशर : पेरूचे सरबत ह्रदयाला स्वस्थ ठेवते व रक्ताभिरण सुधारून ब्लड प्रेशरला कमी करण्यास मदत करते.

👉 मेंदूचा विकास : पेरू मध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे मेंदूचा विकास होतो व मानसिक समस्या, अल्झायमर सारख्या आजरा पासून बचाव होऊ शकतो.

👉नितळ निरोगी त्वचा: पेरूमध्ये अँटिऑक्सिडेन्ट असल्यामुळे सूर्याच्या किरणांमुळे, प्रदूषणमुळे त्वचेची होणारी हानी तसेच व वाढत्या वयाच्या प्रभावामुळे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या या प्रकारच्या समस्या कमी करण्यास उपयुक्त आहे.

👉 कोलेस्ट्रॉल संतुलन : पेरू मध्ये असलेल्या पोटॅशियम मुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रण राखण्यास मदत होते व कोलेस्ट्राँलचे संतुलन राखण्यास मदत होते.

👉स्त्रियांमधील प्रजनन क्षमता वाढवते: पेरु फ्रूट सरबत सेवन केल्यामुळे पेरूमध्ये असलेल्या फोलेट विटामिनचा लाभ स्त्रियांची प्रजनन क्षमता वाढण्यासाठी होतो. 

🌼 काही अन्य रेसिपीस पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👉होममेड हेल्दी हर्बल-(टी) चहाची रेसिपी व फायदे पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.

👉स्वादिष्ट व पौष्टिक आवळ्याचा मुरांबाची रेसिपी पाहण्यासाठी या क्लिक वर क्लिक करा