Instant chana dal modak in marathi | easy modak recipe| roasted chana dal modak

Instant chana dal modak in Marathi


आपल्या लाडक्या गणेशाला या गणेश चतुर्थीला इन्स्टंट चना डाळ मोदक (bhajki chana dal modak) अर्पण करा. महाराष्ट्रात गणरायासाठी उकडीचे मोडक जास्त बनविले जातात. या व्यतिरिक्त आपण गणरायाला चॉकलेट मोडक, तळलेले मोडक, रवा मोडक, दुध पावडर मोडक, पोहे मोडक, मावा मोडक, गव्हाच्या पीठाचे मोदक इत्यादी विविध प्रकारचे स्वादिष्ट मोडक बनवू शकतो.

आज आपण भाजलेल्या चणा डाळीचे झटपट होणारे मोडक बनवणार आहोत जे आपण अगदी कमी वेळात सहज बनवू शकतो.

Instant-chana-dal-modak-marathi



👉चणाडाळीच्या मोदकासाठी साहित्य: Modak Ingredients


  • २ कप भाजलेली चणा डाळ/भाजकी डाल (फुटाना डाल)
  • १ कप साखर
  • १/२ कप गायीचे तूप
  • ४ चमचे दूध पावडर 
  • ३ चमचे डेसिकेटेड कोकोनट 
  • १/२ चमचा वेलची-जायफळ पावडर
  • १/२ चमचा पिवळा खाद्य रंग (ऐच्छिक)
  • २ चमचे पिस्ता-बदाम काप 

👉मोदक बनवण्याची कृती: How to Make Chana Dal Modak


स्टेप १:

  • प्रथम गॅसवर पॅन किंवा कढई गरम करत ठेवा.
  • कढई गरम झाल्यावर डाळ मंद आचेवर पाच मिनिटे भाजून घ्यावी.
  • डाळ फक्त हलकी भाजायची आहे. डाळीचा रंग  हलका सोनेरी झाल्यावर गॅस बंद करा.
  • डाळ चांगली भाजल्यानंतर ती थंड करून घ्या.
  • डाळ पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक पावडर करून चाळून घ्यावी . 
  • आता डेसिकेटेड कोकोनट पण पॅनवर हलका सोनेरी भाजून एका भांड्यात वेगळा काढून ठेवा . 
  • साखरेला मिक्सर मधून वाटून पावडर करून घ्यावी .
  • साखर चाळणीने चाळून घ्या म्हणजे त्यात जाडसर साखरेचे कण शिल्लक राहणार नाहीत.
  • पिस्ता आणि बदामाचे बारीक काप करून घ्या.
स्टेप २ :
  • एका भांड्यात पिठीसाखर व तूप २-३ मिनिटे चांगले फेटून घ्यावे . 
  • आता त्यात दुधाची पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट घालून मिक्स करावे.
  • आता या मिश्रणात भाजलेल्या डाळीचे पीठ थोडं थोडं घालून चांगले मिक्स करून घ्यावे .
  • मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर त्यात फूड कलर आणि वेलची-जायफळ पावडर घालून चांगले मिक्स करा .
  • मिश्रण कोरडे वाटल्यास त्यात थोडे तूप घालून मिक्स करावे.
  • सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव  झाल्यावर मोदकाच्या साचाला आतील बाजूस तूप लावून साच्यामध्ये ड्राईफूट ठेवून नंतर मोदकाचे मिश्रण चांगले दाबून दाबून साच्यात भरावे. 
  • मिश्रण साच्याच्या खालच्या/मोकळ्या बाजूने व्यवस्थित दाबून नंतर साच्यातून मोदक काढून प्लेट मध्ये ठेवा . 
  • अश्या प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यावेत.  
  • स्वादिष्ट आणि स्वाथ्यवर्धक मोदक(Instant chana dal modak) आस्वाद घेण्यासाठी तयार आहेत . 

👉सूचना: Tips  for  Roasted  chana  dal  modak recipe 

  • आपल्याला मोदक मध्ये स्टफिंग भरायचे असल्यास आपण त्यात ड्राईफूट्स आणि गुलकंद मिसळून स्टफिंग बनवू शकता.
  • जर मोदक मिश्रण कोरडे असेल तर आपण तूपा ऐवजी दुधाचा वापर करू शकता.
  • आपण साखरेऐवजी (साखरेचा पर्याय) शुगर सब्स्टिटयूड घालून मोदक देखील बनवू शकता.
  • आपल्याला जास्त गोड आवडत असल्यास साखरेचे प्रमाण वाढवू शकता.
  • तुम्ही साखरेऐवजी गूळ देखील वापरू शकता (फक्त गुळामुळे मोदकाचा कलर थोडा बदलेल).

👉अन्य स्वादिष्ट व चविष्ट रेसिपी साठी खालील लिंक वर क्लिक करा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या