homemade vegetable samosa recipe | Healthy Samosa without potato in marathi

Homemade Vegetable Samosa Recipe


आज आपण मोड आलेले मुग व मटकीचा वापर करून स्वादिष्ट व पौष्टिक समोसे (Healthy Vegetable Samosa Recipe) बनवणार आहोत.समोसे पौष्टिक व्हावेत यासाठी आपण मैद्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा (wheat flour) वापर केलेला आहे. पार्टी समारंभासाठी हा एक उत्तम स्नॅक्स पर्याय असू शकतो.


👉पौष्टिक समोसे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य.


  • 1 कप मोड आलेले मुग
  • 1 कप मोड आलेली मटकी
  • 1/2 कप सिमला मिरची (चिरलेली)
  • 10-15 लसणीच्या पाकळ्या
  • 1/4 चमचा हळद
  • 1 चमचा धने-जिरेपूड
  • 1/2 चमचा आमचूर पावडर
  • 1/2 चमचा चाट मसाला
  • 4 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
  • 1 1/2 मोठे चमचे तेल
  • चवीनुसार मीठ
  • मुठ भर कोथंबीर
  • 1 छोटा चमचा साखर
  • 10-12 मनुका (ऐच्छिक)
  • 1/4 कप शेंगदाणे (ऐच्छिक)

👉समोसाच्या कोटिंगसाठी लागणारे साहित्य


  • 1 कप गव्हाचे पीठ (कणिक)
  • 1/2 कप रवा
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

👉समोसा बनवण्याची कृती /विधी: How to make wheat flour samosa at home

 

स्टेप १:
  • सर्वप्रथम परातीत कणिक, रवा आणि दोन चमचे गरम तेल(मोहन),चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण हाताने चोळून एकजीव करून आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट मळून घ्यावे.
  • पीठ चांगले मळून झाल्यावर ते साधारणतः एक तासभर ओल्या कपड्याखाली झाकून ठेवावा.
  • गॅसवर पॅन गरम करून त्यात जाडसर वाटलेल्या मिरच्या व लसूण घालून परतून घ्या.
  • नंतर त्यामध्ये लाल मिरच्या पावडर, हळद पावडर, धने जिरे पावडर, मोड आलेले मूग व मटकी शेंगदाणे घालावे.
  • आता त्यात चवीनुसार मीठ, साखर घालावी. त्यात साधारण दिड कप पाणी घालून त्यावर झाकण न शिजवून घ्यावे.
  • हे शिजल्यावर त्यात चिरलेली सिमला मिरची, कोथंबीर घालावी व संपूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यावे.
  • भाजी शिजल्यावर शेवटी त्यात आमचूर पावडर, चाट मसाला,चिरलेली कोथंबीर,मनुका घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
  • आता हे तयार झालेले समोस्याचे  सारण / स्टफिंग बाजूला ठेवावे.
स्टेप २:
  • मळलेल्या कणकेचा एक छोटा गोळा घेऊन मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून घेऊन त्याचे सुरीच्या सहाय्याने मध्ये कट देऊन दोन समान भाग करून घ्यावे.
  • आता कापलेल्या अर्ध्या भागाचा खणा प्रमाणे त्रिकोणी घडी /कोण करून त्यात हे तयार मिश्रण (स्टफिंग )भरून मोकळ्या बाजूचे किनारे चांगले दाबून बंद करून घ्या.
  • किनारे बंद करताना त्यास पाण्याचा हात लावून बंद करावेत म्हणजे किनारे सुटत नाहीत.
  • अशाप्रकारे सर्व समोसे स्टफिंग भरून तयार करून घ्या.
  • सर्व समोसे तयार झाल्यावर कढईमध्ये तेल टाकून गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यावर समोसे टाकून मध्यम आचेवर कुरकुरीत आणि गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • अशाप्रकारे सर्व समोसे तळून झाल्यावर टिशू पेपर वर काढून घ्या आणि गरमागरम समोसे (homemade vegetable samosa recipe) टॉमेटो साॅस किंवा चिंचेची आंबट-गोड चटणी बरोबर खायला द्या.

👉टीप.Tips for making a healthy samosa recipe

  • आपण गव्हाच्या पिठाची भाजी मैद्याचे पीठ वापरू शकता.
  • समोसे यात हवा असल्यास गरम मसाला ही घालू शकतो.
  • आमचूर पावडर ऐवजी लिंबाचा रस घालू शकतो.
  • समोसे जास्त हेल्दी बनविण्यासाठी एयर फ्राईयर किंवा ओव्हन मध्ये बनवू शकता. 

👉अन्य स्वादिष्ट पदार्थांच्या रेसिपी साठी पुढील लिंकवर क्लिक करा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या