झणझणीत गावरान मसालेदार पिठलं । Maharashtrian pithal recipe

 

झणझणीत गावरान मसालेदार पिठलं

 मराठमोळं पारंपारिक गावरान खमंग पिठलं (maharashtrian pithla recipe) तुमचा आमचा सगळ्यांच्याच परिचयाचा व आवडीचा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. पिठलं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवल जात. आज मी तुमच्या बरोबर झणझणीत मसालेदार पिठलं रेसिपी शेअर करत आहे . झटपट होणारी सगळ्यात सोपी रेसिपी आहे. चला मग बनवूया सोपी पण स्वादिष्ट झणझणीत मसालेदार पिठलं रेसिपी.


पिठलं बनविण्यासाठीचे साहित्य: Ingredients for Maharashtrian pitla

  • बेसनाचे पिठ : १ कप
  • मध्यम आकाराचे कांदे    : २ नग
  • हळद : 1/4  चमचा 
  • तिखट/लाल मिरची पावडर:  1 चमचा आवडीनुसार
  • मीठ : चवी पुरते
  • लसूण पाकळया 7-8
  • हिरवी मिरची 1-2
  • कोंथिबीर
  • फोडणीचे साहित्य  :
  •  तेल
  • मोहरी :1/4 चमचा
  • जीरे : 1/4 चमचा
  • कढीपत्ता 7-8 पाने
  • चिमूटभर हिंग

 

पिठलं बनविण्याची कृती/विधी :

  • प्रथम कांदे उभे लांबट (कांदा भजी प्रमाणे) चिरून घ्यावे
  • हिरव्या मिरच्या आणि लसूण खलबत्यात जाडसर कुटून घ्या.
  •  गॅसवर कढई गरम करून घ्यावी.
  • नंतर त्यात फोडणीच्या तेला पेक्षा थोडे जास्त तेल घालावे.
  • तेल तापल्यावर त्यात मोहरी घालावी,मोहरी तडतडल्यावर त्यात जीरे,हिंग घालावे.
  • आता त्यात चिरलेला कांदा टाकून हलका गोल्डन ब्राऊन होऊ द्यावा.
  • नंतर त्यात लसूण मिरचीचा ठेचा आणि हाताने तोडून कढीपत्ता घालून परतून घ्या.
  • आता त्यात थोडी चिरलेली कोंथिबीर परतून घ्या. नंतर त्यात तिखट, हळद,मीठ घालून अंदाजे दोन कप पाणी टाका.
  •  पाण्याला उकळी आल्यावर मंद गॅस करून त्यात हळू हळू एका हाताने थोडे थोडे करून बेसन पीठ भुरभुरावे व चमच्याने दुसऱ्या हाताने सतत ढवळून एकजीव करावे. (त्यात गुठळ्या राहू नयेत हे पाहावे).
  • पिठलं घट्ट हवा असल्यास वरून थोडे बेसन पीठ भुरभुरू शकता.
  • साधारण घटट् होत आले की, वरून झाकण ठेवून ३-४ मिनट एक वाफ काढून घ्या.
  • गरम गरम झणझणीत गावरान मसालेदार पिठलं तयार आहे. कोणत्याही प्रकारच्या भाकरी बरोबर स्वादिष्ट लागत. सोबत मिरचीचा ठेचा असल्यास उत्तम.  
Tips for making pithla recipe

१) तुम्हाला आवडत असल्यास एखादा टोमॅटो पण टाकू शकता. 
२) वरून गार्निशिंगसाठी तुम्ही कोथंबीर भुरभुरू शकता. 
३) भाकरी किंवा रोटी बरोबर गरमागरम पिठलं चवीला खूप मस्त लागत.
4) पिठल्यातं आले पेस्ट ,गरम मसाला पावडर,धने-जीरे पावडर ही घालू शकता.
5) पिठल्यातं कोकमची आमसूल किवां शेंगदाणा कूट ही घालतात.


अन्य स्वादिष्ट व रूचकर रेसिपीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

१) चटपटीत लिंबाचे लोणचे रेसिपी.

२) टेस्टी बटाटा मसाला पुरी/ स्टफ आलू पुरी रेसिपी.

३) कच्च्या फणसाची रुचकर भाजी रेसिपी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या