mix flour ladoo in marathi | wheat flour besan rava ladoo in marathi


Wheat Flour Besan Rava Ladoo

गव्हाचे पीठ, बेसन आणि रव्याचे लाडू (mix flour ladoo) बनवणे खूप सोपे आहे. कोणत्याही समारंभात आनंदाच्या प्रसंगी आपण हे लाडू सहज बनवू शकतो. गव्हाचे पीठ, बेसन आणि रव्यापासून बनवलेले हे लाडू अत्यंत स्वादिष्ट व पौष्टिक असतात. आपण हे लाडू बनवून एअर टाईट डब्यात भरून स्टोअर करू शकता. जेव्हा केव्हा हलकीफुलकी भुक लागेल तेव्हा किंवा मधल्या वेळाला हे लाडू आपण खाऊ शकता. चला आपण बनवूया पौष्टिक मिश्र पिठाचे लाडू.



👉लाडू साठी  लागणारे आवश्यक साहित्य: Ingredients for atta besan Rava laddu recipe

  • 2 कप गव्हाचे पीठ -wheat flour 
  • 1 कप बेसन पीठ- chickpeas flour 
  • 1 कप बारीक रवा -semolina 
  • 1/2 कप मखाने -makhana /fox nuts
  • 1/2 कप डिंक- edible gum 
  • 1 कप साजूक तूप- Ghee 
  •  2 कप पिठीसाखर -powderedsugar 
  • 10-12 काजू बदाम -cashew nuts, almonds 
  • आवडीनुसार मनुका चारोळी- chironji, Raisins 
  • 1 चमचा वेलची जायफळ पावडर -cardamom and nutmeg powder 


👉लाडू बनवण्याची कृती. How to Make Aata Besan Suji Laddu Recipe


स्टेप 1:
  • गव्हाचे पीठ,बेसन आणि रव्याचे लाडू बनविण्यासाठी सर्वप्रथम काजू आणि बदामाचे बारीक बारीक पातळ काप कापून ठेवा.
  • आता कढईमध्ये तूप टाकून गरम करून घ्या. त्यात थोड्या थोड्या मात्रेमध्ये डिंक टाकून फुलवून घ्या आणि फुलवलेला डिंक प्लेटमध्ये काढून थंड करून घ्या.
  • आता त्याच तुपामध्ये थोडे थोडे मखाने टाकून फुलवून तळून घ्या.
  • तळलेले मखाने प्लेट मध्ये काढून घ्या.
  • आता तुपामध्ये पातळ कापलेली ड्रायफ्रूट घालून हलका लाल रंग येईपर्यंत तळून घ्या आणि नंतर प्लेट मध्ये काढून ठेवा.

स्टेप 2:

  • आत्ता कढईमध्ये गव्हाचे पीठ टाकून कोरडेच मंद गॅसवर हलके सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या आणि हलका सोनेरी रंग आल्यानंतर पराती मध्ये काढून ठेवा.
  • आता कढईमध्ये बेसन पीठ टाकून मंद गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत कोरडेच परतून घ्या आणि भाजलेल्या गव्हाच्या पिठाचे मध्ये मिक्स करा. 
  • आता कढईमध्ये बारीक रवा टाकून मंद गॅसवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या आणि प्लेटमध्ये काढून घ्या.
  • आता कढईमध्ये परतलेली सर्व पीठ घालून आवश्यकतेनुसार थोडे-थोडे साजूक तूप घालून मंद गॅसवर दोन ते चार मिनिट परतून घ्या आणि परतलेली पीठ परातीत काढून ठेवा .

स्टेप 3:

  • आता मिक्सर मध्ये तळलेले मखाने घालून बारीक पावडर करून घ्या आणि बाजूला काढून ठेवा.
  • मिक्‍सर जारमध्ये फुलवलेला डिंक घालून हल्कासा बारीक पावडर करून घ्या आणि परतलेल्या पीठात मिक्स करा.
  • परतलेल्या पीठात तळलेले ड्रायफ्रूट्स आणि वेलची-जायफळ पावडर, पिठीसाखर घालून चांगले एकजीव करून घ्या.
  • आता मिश्रण चांगले मिक्स झाल्यावर मनुका आणि चारोळी लावून छोट्या छोट्या आकाराचे गोल-गोल लाडू बनवून प्लेट मध्ये ठेवा आणि अशाच प्रकारे सर्व लाडू करून द्या.
  • अशा प्रकारे तयार झाले आपले स्वादिष्ट आणि पौष्टिक मिश्र पिठाचे (गव्हाच्या पिठ, बेसन आणि रव्या पासून बनवलेले) लाडू.
  • तयार झालेले लाडू (wheat flour besan rava ladoo )एअर टाईट डब्यात भरून ठेवा आणि पाहिजे तेव्हा त्याचा आस्वाद घ्या .

👉टीप. Tips for making mix flour ladoo in marathi


  • लाडवात साखरे ऐवजी गूळही घालू शकता.
  • लाडू वळले जात नसतील तर थोडेसे तूप घालून मिक्स करा आणि मग लाडू बनवा .
  • लाडवात पिठीसाखर आपल्या चवीनुसार कमी जास्त करु शकता.
  • गव्हाचे पीठ भाजताना जर आधी तूप घातले तर गव्हाचे पीठ व्यवस्थित भाजले जात नाही आणि त्याचा पीठ भाजल्यानंतर येणारा रंग ही समजत नाही. 
  • पीठ कोरडेच भाजले की वेळ ही कमी लागतो. 

👉अन्य काही रेसिपी बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या