Heathy jambhul sharbat in marathi

जांभूळाचे सरबत रेसिपी: आरोयदायी व स्वादिष्ट पेय


जांभूळाचे स्वादिष्ट सरबत (Indian blackberry sharbat) पटकन होणारे आरोग्यदायी पेय आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत जांभूळ फळे बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. या फळाची रुचकर आणि रसाळ चव आपल्या जिभेवर लहानपणीपासून ओळखीची आहे. जांभूळ हे फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही महत्त्वपूर्ण आहे. 

जांभळात असणारे अँटिऑक्सिडंट्स,विटामिन-सी,आणि फायबर हे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत.



healthy-jambhul-sarbat-recipe-marathi


जांभूळाचे सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य:


  • २५० ग्रॅम जांभूळ
  • १५० ग्रॅम साखर किंवा गूळ (तुमच्या आवडीप्रमाणे)
  • ३ लिंबांचा रस
  • चवीपुरते काळे मीठ
  • १/४ टी. स्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर 
  • १/४ टीस्पून मिरपूड 
  • पाणी (जांभूळ बुडतील एवढे)

 जांभूळाचे सरबत बनवण्याची सोपी पद्धत:


१. जांभूळे धुवा
सर्वप्रथम, जांभूळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. 

२. जांभूळे शिजवा
एका पॅन मध्ये पाणी गरम करा. त्यात धुतलेली जांभूळे घालून मंद आचेवर शिजवा, जोपर्यंत ती मऊ होत नाहीत.

३. बिया वेगळ्या करा
शिजल्यानंतर जांभूळे थंड होऊ द्या. नंतर त्याच्या  बिया काढून वेगळ्या करा.

४. पेस्ट बनवा
शिजलेली जांभूळे पोटॅटो स्मॅशरने स्मॅश करून घ्या किंवा मिक्सरमध्ये टाकून बारीक पेस्ट तयार करा.

५. गाळून घ्या
जांभूळाची पेस्ट गाळणीने /स्टेनरने गाळून घ्या, जेणेकरून सालाचे तुकडे (चोथा) वेगळे होतील.

६. सरबत तयार करा
गाळलेल्या पेस्टमध्ये साखर, लिंबाचा रस, चवीपुरते काळे मीठ,मिरपूड,भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून चांगले मिसळा. आवश्यकतेनुसार साखरेचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.

७. थंड करण्यासाठी ठेवा
तयार झालेले सरबत एका काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा.

८. थंड पाणी घालून सर्व्ह करा
थंड झाल्यावर सरबत गार पाण्यात मिसळून सर्व्ह करा. तुम्ही यात बर्फाचे तुकडेही घालू शकता.

जांभूळाचे सरबत पिण्याचे आरोग्यदायी फायदे:

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवते:  जांभूळातील विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
  • उष्णतेपासून बचाव:  पावसाळ्यात उष्णतेपासून वाचण्यासाठी जांभूळाचे सरबत मदत करते.
  • त्वचा सुधारते:  अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते.
  • पाचन सुधारते: जांभूळातील फायबर पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते आणि कब्ज दूर करते
  • डायबेटिस नियंत्रण:  जांभूळातील फायबर रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
  • स्वस्थ हृदय : जांभळाच्या फळामध्ये आढळणाऱ्या काही आरोग्यदायी तत्त्वांमुळे हृदय कार्यक्षम होण्यास मदत होते . 
  • हाडे मजबूत होतात :जांभुळामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी , कॅल्शियम असते त्यामुळे हाडे मजबूत होतात 


अधिक टिप्स:Tips 


  • सरबतात थोडेसे पुदिना किंवा मीठे लिंबू घालून स्वाद वाढवू शकता.
  • जांभूळाचे सरबत फ्रिजमध्ये १ दिवसासाठी ठेवल्यास त्याची चव टिकते.
  • आपल्या चवीनुसार मिरपूड ,मीठ, जिरं पावडर घालू शकतो .
  • जर तुंम्हाला शरबतांमध्ये जांभळातील फायबरचा अंश हवा असल्यास तुम्ही न गाळता शरबत बनवू शकता  
  • मधुमेह रुग्णांसाठी बनवणार असल्यास साखरेच्या ऐवजी स्टीव्हिया पावडर/शुगर फ्री टाकून बनवू शकतो . 

👉निष्कर्ष:

जांभूळाचे सरबत हे उन्हाळ्याच्या दिवसातील एक ताजेतवाने करणारे पेय आहे. हे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असून उष्णतेपासून बचाव करण्यास मदत करते. आता तुम्हीही घरी हा सोप्पा रेसिपी वापरून जांभूळाचे सरबत बनवा आणि ताजेतवाने व्हा !




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या