Methi ladoo recipe| dinkache ladoo| methi ladoo health benefits in marathi

मेथी लाडू रेसिपी: डिंक मेथीचा लाडू हा खूप पौष्टिक असून थंडीच्या दिवसात आरोग्य उत्तम व ऊर्जावर्धक राखण्यासाठी तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा लड्डू खूप उपयुक्त आहे. 

हिवाळ्यात ज्याप्रकारे आपण गरम कपड्याने शरीराचे स्वरंक्षण करतो त्याच प्रकारे शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आतूनही गर्मीची(उष्मांकाची)आवश्यकता असते.म्हणून पूर्वापार पद्धतीप्रमाणे या ऋतू मध्ये विशिष्ट प्रकारचे आहार खाल्ले जातात. जसे तिळाचे लड्डू, मेथीचे लड्डू वैगेरे .

हा मेथीचा लड्डू विशेष करून बाळंतपणानंतर बाळंतीणीला देण्याच्या सल्ले/सूचना खास करून केल्या जातात. बाळंतपणा नंतर स्त्रियांमध्ये येणारी शारीरिक कमजोरी,शरीराची होणारी झीज भरून काढून मातेच्या दुधाचे प्रमाण वाढण्यासाठी मेथीचा लड्डू उत्तम मानला जातो.

मेथीच्या लाडू मध्ये वापरलेली सर्व साहित्य पोषक तत्वांनी भरपूर आहे. यामध्ये असणारे मेथी,डिंक, साजूक तूप,सुठ,खारीक अश्या बऱ्याच पौष्टिक तत्वांनी परिपूर्ण गोष्टीच्या वापरामुळे हा लाडू आपल्या एकूणच पोषणासाठी  खूप उपयुक्त आहे.

मेथी मध्ये असलेल्या औषधीय गुणांमुळे थंडीमध्ये खाल्याने विशेष फायदे होतात. मेथी मध्ये सोल्युबर फायबर, अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन, कॉपर,जिंक, सोडीयम, कॅरोटीन, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम,प्रोटीन आणि मिनरल भरपूर प्रमाणात असतात. त्याशिवाय मेथीत ग्लॅक्टोमेनन नावाचं फायबर रक्तातील साखरेचे शोषण करते, त्यामुळे साहजिकत शुगर कंट्रोलमध्ये राहते.

असा हा पौष्टिक, बलवर्धक, अनेक धातूचे पोषण करणारा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा मेथीचा लाडू आपल्या आहारामध्ये अवश्य समावेश केला पाहिजे.



methi ladoo recipe
Methiche Ladoo


          पौस्टिक मेथीचे लाडू 

मेथीच्या लाडूचे साहित्य : Ingredient Of Methi Laddu 

  1. एक किलो गहू - (Wheat )
  2. १/२ किलो बारीक़ रवा - ( Sooji/Semolina)
  3. २५० ग्राम मेथी दाणे - (Fenugreek seeds)
  4. ७५०  ग्राम साजूक तूप - (Ghee)
  5. १०० ग्राम डिंक  - ( Edible dink/gond)
  6. १०० ग्राम बादाम,काजू  (Almond, Cashew)
  7. २० ग्राम सुंठ पाउडर - (Sooth Powder) 
  8. १  किलो गुळ - (Jaggery)
  9. २५० ग्राम सूखा नारियल- (Dry Coconut) 
  10. १ टी स्पून इलायची-जायफल पावडर (Cardamom, Nutmeg)
  11. १५० ग्राम मखाने - (Fox Nuts)
  12. २५० ग्राम खारिक - (Kharik)
  13. २५ ग्राम खसखस - (Poppy Seeds)
  14. १०० ग्राम हालीम - (Halim Seeds)

लाडू बनविण्याची कृती :

स्टेप १ :

  1. सर्वप्रथम गॅसवर जाड बुडाची कढई तापत ठेवा. 
  2. कढई तापल्यानंतर त्यात गहू टाकून मंद गॅसवर त्याचा कच्चे पणा जाऊन गहू भाजल्याचा खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्या. 
  3. गहू चांगले भाजून झाल्यावर एका प्लेट काढून थंड करून घ्या. 
  4. गहू थंड झाल्यानंतर जरा जाडसर (रव्याप्रमाणे) दळून घ्या. 
  5. नंतर मेथी(दाणे) कढईत घालून जरा हलकी-हलकी भाजून घ्या. 
  6. मेथी थंड करून मिक्सर जार मधून पावडर करून घ्या.
  7. नंतर मेथीच्या पीठात १/४ तूप घालून चांगले हाताने चोळून एकत्र करून दोन-तीन दिवस मुरवत ठेवा. 
  8. पीठ तुपात मुरवत ठेवल्याने त्याचा कडूपणा कमी होतो. 

स्टेप २ :

  1. एका कढईत मध्यम आचेवर एक-दोन चमचा तूप घालून गरम करत ठेवा. 
  2. तूप विरघळल्यानंतर त्यावर मखाने गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  3. ४-५ मिनिट भाजल्यानंतर एका प्लेट मध्ये काढुन थंड करून घ्या . 
  4. सुक्या खोबऱ्याचा वाट्या किसून घ्या, नंतर कढईत घालून मंद आचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. 
  5. खोबर चांगले भाजून झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून थंड करून घ्या.थंड झाल्यावर हाताने चुरुन घ्या. 
  6. नंतर कढईत १ छोटा चमचा तूप घालुन हलीम खमंग भाजून घ्या. नंतर प्लेट मध्ये काढून घ्या. 
  7. कढईत मध्यम आचेवर तूप गरम करून घ्या,त्यात थोडा थोडा डिंक घालून फुलेपर्यंत तळून घ्या. 
  8. डिंक तळून झाल्यानंतर एका प्लेट मध्ये काढुन ठेवा.
  9. डिंक थंड झाल्यावर लाटण्याने किंवा वाटीच्या साहाय्याने त्याची पावडर करून घ्या. 
  10. खारकांच्या बिया काढून त्याचे लांबट-लांबट बारीक तुकडे करून घ्या. 
  11. कढईत तूपात खारकेचे बारीक केलेले तुकडे घालून तळून घ्या,एका प्लेट मध्ये काढून थंड झाल्यावर मिक्सरमधून पावडर करून घ्या . 
  12. थोड्या तुपावर काजू, बदामचे बारीक तुकडे परतून घ्या. 
  13. त्यानंतर खसखस कढईत खमंग परतून घ्या आणि प्लेट मध्ये काढून घ्या. 
  14. कढईत तूप गरम करून त्यात मध्यम आचेवर कणिक घालून हलका सोनेरी रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्या.  
  15. अश्याच प्रकारे सर्व थोडे-थोडे पीठ भाजून घ्या आणि परातीत काढून घ्या . 
  16. नंतर तुपावर बारीक रवा खमंग भाजून घ्या आणि बाजूला प्लेट मध्ये काढून घ्या.   
स्टेप ३:
  1. एका परातीत वरील भाजलेले सर्व साहित्य घेऊन एकत्र करून घ्या. 
  2. त्यात भिजवलेले मेथीचे पीठ हाताने चांगले चोळून हाताने व्यवस्थित(फेसावे) मिक्स करून घ्या.
  3. नंतर त्यात जायफळ-वेलची पावडर घालून सर्व एकत्र करून घ्यावे. 
  4. जाड बुडाच्या कढईत तूप घालून गरम करून घ्या. 
  5. तूप तापल्यानंतर मंद गॅसवर बारीक केलेला गूळ किंवा गूळ पावडर घालून विरघळवून घ्या. 
  6. गूळ विरघळेपर्यंत चमच्याने सतत ढवळा. (फक्त गूळ विरघळवून घ्या, त्याचा पाक करायचा नाही आहे)
  7. गूळ विरघळल्यानंतर गॅस लगेच बंद करा. 
  8. गूळ विरघळल्यावर परातीतल्या मिश्रणात हा गुळाचा पाक घालून चांगले चमच्याने एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या . 
  9. आपल्याला आवडतील तेवढ्या छोट्या-मोठया आकाराचे लाडू वळून घ्या. 
  10. लाडू झाल्यावर एअर टाइड डब्यात भरून ठेवा. 
  11. सकाळी दुधाबरोबर एक लाडू खाल्याने विशेष लाभ होतो. 

टीप :Tips 

  1. लाडवात गुळाच्या जागी पिठी साखर ही वापरू शकतो.
  2. सुंठ पावडरच्या जागी काळी मिरी, ओवा पावडर पण वापरली जाते. 
  3. गव्हाच्या पिठा ऐवजी मुंगडाळीचे पीठ, उडीद डाळीचे पीठ ही वापरले जाते.
  4. मेथीचे पीठ कमीतकमी आदल्या दिवशी तुपात भिजत ठेवावे. 
  5. गुळाचा पाक करताना गॅस मंद ठेवावा, नाहीतर पाक पक्का होईल आणि लाडू वळता येणार नाही.
  6. लाडू वळले जात नसतील तर गरजेप्रमाणे पातळ तूप घालू शकता.  
  7. खसखस भाजून त्याची पावडर करून ही घालू शकतो. 

🌼 मेथी के लाडू खाण्याचे फायदे : Methi Ladoo Benefits 

  1. मेथीच्या लाडवात वापरलेले सर्व साहित्य औषधीय गुणधर्मानी परिपूर्ण असल्यामुळे प्रसूती नंतर महिलांच्या शरीरातील दुर्बलता दूर करण्यासाठी अत्यन्त गुणकारी आहेत. 
  2. मेथी बद्धकोष्ठता आणि पाचनतंत्राची कार्यक्षमता सुधारते. 
  3. मेथीत मोठयाप्रमाणात लेसिथिन,प्रोटीन आणि निकोटोनिक असते त्यामुळे केसांना मजबुती प्राप्त होऊन केस गळणे कमी करते. 
  4. मेथीच्या लाडू मुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. 
  5. रक्ताभिसरण सुधारते आणि हृदविकाराचा धोका कमी होतो. 
  6. मेथी मध्ये एमिनो एसिड असल्याने मेथी खाल्याने शरीरातील इन्सुलिनची मात्रा वाढते आणि शुगर कंट्रोल मध्ये राहते.
  7. थंडी मध्ये हा लाडू खाल्ल्याने शरीराला जरुरी गर्मी (उष्मांक) वाढून रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.    
  8. कंबरदुखी आणि गुडघेदुखी सारख्या अनेक समस्यावर अत्यंत गुणकारी मेथीचे लाडू थंडीत विशेष फायदेशीर असतात .  
  9. मेथीत एस्ट्रोजेनिक प्रभाव असल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा उत्तम पर्याय होऊ शकतो. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या